मुंबई : HSC आणि SSC बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १० वी लेखीपरीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान तर, १० वी लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने (ऑफलाईन) होतील. नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो आता कंबर कसून अभ्यासाला लागणे महत्त्वाचे आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या तारखा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्यात.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे. उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील.
दहावीच्या परीक्षा या १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान पार पडणार आहेत. त्याचसोबत बारावीच्या लेखी परीक्षा या ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान पार पडणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन या परीक्षा नियमित पद्धतीने होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
इ.१२वी लेखीपरीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान तर,इ.१०वी लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने(ऑफलाईन) होतील.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे.उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील. pic.twitter.com/i0wbWBE9H5
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 16, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इयत्ता १२ वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इ. १०वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील. तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य,सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे.
सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक,पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
या परीक्षा कशा होणार केंद्र कोणती असणार? कोरोनाचे सर्व नियम पाळून परीक्षा कशा होणार याबाबत सविस्तर माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या हातात अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.