सोलापूर : सोलापूर शहरात कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह २९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शहरातील होटगी रोड विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमध्ये पत्त्यांचा जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. होटगी रोडवर विमानतळाशेजारील हे हॉटेल रविकांत पाटील यांच्या मालकीचे आहे.
होटगी रोडवर विमानतळाशेजारी माजी आमदार रविकांत पाटील यांच्या मालकीचे हॉटेल आहे. त्याठिकाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर साळुंखे व सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाडिक यांच्या पथकाने रात्री ११ च्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमध्ये पत्त्यांचा जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले.
या छाप्यात पोलिसांनी हॉटेल मालक रविकांत पाटील यांच्यासह जुगार खेळणार्या तब्बल २९ जणांना ताब्यात घेतले. यावेळी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर रविकांत पाटील यांच्यासह सर्वच जुगार्यांना विजापूर नाका पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याठिकाणी मध्यरात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
कारवाईचे अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
दरम्यान, रविकांत पाटील यांना ताब्यात घेतल्याचं समजताच त्यांच्या समर्थकांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* सांगोला येथून ९२ हजाराचे लोखंड पळविले
सोलापूर : सांगोला येथील हॉटेल अविरतच्या पाठीमागील मोकळ्या जागेतून चोरट्याने ९२ हजाराची लोखंडी सळई चोरून नेली. ही घटना काल शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत बांधकामासाठी लोखंडी सळई ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी १ हजार४०० किलो सळई चोरून नेली. अशा आशयाची फिर्याद बाबासाहेब गळवे यांनी सांगोला पोलिसात दाखल केली. हवालदार वजाळे पुढील तपास करीत आहेत.
* ट्रॅक्टरची ट्रॉली निसटून दुचाकीला धडक दिल्याने दोघे जखमी
सोलापूर : टेंभुर्णी ते कुर्डवाडी रोड वरील तांबवे शिवारात वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या पाठीमागील पिन निसटून ट्राली पुढे जाऊन एका दुचाकीला धडकल्याने ब्रह्मदेव शांतीलाल लोंढे (वय २७) आणि त्याचा भाऊ विष्णू लोंढे (वय २५ दोघे रा. निमगाव तालुका माढा) हे दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळच्या सुमारास घडला. लोंढे बंधू दुचाकीवरून निघाले होते त्यावेळी ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉली निसटून समोरच्या दुचाकीला धडकली. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणात टेंभुर्णीच्या पोलीसांनी दत्ता महादेव चव्हाण (रा. आढेगाव)या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार तांबोळी पुढील तपास करीत आहेत .