नवी दिल्ली : एका व्यक्तीला एकदाच पंतप्रधानपद भूषविता येईल, अशी तरतूद करण्याची गरज आहे, अशी मागणी लेखिका व हिंदुत्वविरोधी सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनी केली आहे. तसेच मोदी सरकारने दहशतवादाची व्याख्या बदलली असून सुधा भारद्वाज, आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा सारख्या बुद्धिजीवींना दहशतवादी ठरविले आहे, असेही त्या म्हणाल्या.
प्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनी केलेल्या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या अत्याचाराला दोन वर्ष झाल्या निमित्त प्रेस क्लब ऑफ इंडिया तर्फे आयोजित कार्यक्रमात अरुंधती रॉय यांनी हे विधान केलं आहे.
अरुंधती रॉय म्हणाल्या, ”एका व्यक्तीला एकदाच पंतप्रधानपद भूषविता आले पाहिजे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एकदा हे पद भूषविल्यानंतर या पदावर दुसऱ्या व्यक्तीला काम करण्याची संधी मिळाली पाहिजे,” तशी तरतूद करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
”शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे कृषी कायदे मागे घ्यावे, त्याचप्रमाण मोदी सरकारला एनआरसीचा कायदाही मागे द्यावा, लागेल,” असे रॉय म्हणाल्या. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवावा लागेल, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे कृषी कायदे मागे घ्यावे लागले त्याचप्रमाणे एनआरसीचा कायदाही मागे घ्यावा लागेल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी उपस्थित होते. अरुंधती रॉय यांनी हे विधान करतांना कुणाचेही नाव घेतलं नाही, पण त्यांचा रोख हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता.
”मोदी सरकारने दहशतवादाची व्याख्या बदलली आहे. सुधा भारव्दाज, आनंद तेलतुंबडे, गैातम नवलखा यांच्यासारख्या वुद्धीजीवी व्यक्तींना मोदींनी दहशतवादी ठरविले. मोदीं सरकारनं यूएपीए या कायद्याचा दुरुपयोग करुन निरपराध व्यक्तींना अनेक महिन्याासून तुरुंगात पाठविले. या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविला पाहिजे,” असे अरुंधती रॉय म्हणाल्या.