सोलापूर : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर १५ ते १८ या वयोगटातील मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून होणार असल्याची माहिती सोलापूर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी आज बुधवारी दिली.
सोलापूर महानगरपालिकेकडून १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांना लस देण्याचे काम सुरू आहे. मात्र १८ वर्षांखालील मुलांना कोविड लस देण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाली नव्हती. त्यामुळे या वयोगटातील मुलांचे लसीकरण थांबले होते. मात्र आता शासनाकडून वय वर्षे १५ ते १८ या वयोगटातील मुलांना लस देण्याबाबत सूचना प्राप्त झाल्यामुळे ३ जानेवारीपासून या मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे.
या वयोगटातील सोलापुरातील ९० हजार मुलांना कोवॅक्सीनचा डोस देण्यात येणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर लसीचा तिसरा डोस अर्थात बुस्टर डोस तीन घटकातील नागरिकांना देण्यात येणार आहे. यामध्ये हेल्थ वर्कर, फ्रन्टलाइन वर्कर आणि ६० वर्षांवरील व्यक्तींचा समावेश आहे. बूस्टर डोसचे लसीकरण १० जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे १ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांनाही ‘जापनीज इन्सिलेपसिस’ या आजारासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. ३ ते २१ जानेवारी या दरम्यान याने १ लाख ८२ हजार मुलांना ही लस देण्यात येईल. सर्व शाळांमध्येही लसीकरण करण्याबाबत तयारी सुरू असल्याचे उपायुक्त पांडे यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उपायुक्त धनराज पांडे यांनी केलेल्या आवाहनासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
पंधरा ते आठरा वयोगटातील मुलांचे लसीकरण येत्या तीन जानेवारी पासून सुरू होणार असून एक ते पंधरा वयोगटातील मुलांसाठीही लवकर लसीकरण सुरू होणार असल्याचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितले
१८ ते २५ वयोगटातील मुलांना पहिला लसीकरणाचा डोस दिला जाणार असल्याची माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली, या वयोगटातील मुलांना फक्त कोव्हक्सीन ही लस दिली जाणार असून महापालिकेच्या सर्व केंद्रावर ही लस उपलब्ध असणार असून जास्तीत जास्त युवक युवतींनी आपले लसीकरण करून घ्यावे, असेही आवाहन केले आहे.
आता एक ते पंधरा वयोगटातील मुलांना देखील आता व्हॅक्सीनेशन कँप आयोजित करण्यात येणार असून याचे व्हॅक्सीनेशन शाळांमध्ये होणार आहे. दहा जानेवारीपासून बूस्टर डोस देखील दिला जाणार असून यामध्ये हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर्स आणि साठ वर्षापुढील नागरिकांना हा डोस दिला जाणार असल्याचे उपायुक्त धनराज पांडे म्हणाले.
¤ लसीकरणासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक
वय वर्ष १५ ते १८ तसेच हेल्थ वर्कर फ्रन्टलाइन वर्कर आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर १ ते १५ वर्षे वयोगटातील मुले यांना देण्यात येणाऱ्या लसीकरणासाठी सर्वांचा सहभाग असणे आवश्यक आहे. महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही लस देण्यात येणार असून नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन उपायुक्त धनराज पांडे यांनी केले आहे.