नवी दिल्ली : भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक आरबीएलमध्ये आर्थिक घडामोडी वाढल्या आहेत. भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला आणि डी-मार्टचे सर्वेसर्वा आर के दमानी आरबीएल बँकेत भागीदारी घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जातेय. झुनझुनवाला दमानी दोघांचाही आरबीएलमध्ये दहा टक्के भागीदारीचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेच्या विचाराधीन असल्याचे वृत्त आहे. मात्र, अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक आरबीएलमध्ये आर्थिक घडामोडींना वेग आला आहे. भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला आणि डी-मार्टचे सर्वेसर्वा आर के दमानी आरबीएल बँकेत भागीदारी घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
आरबीएलमध्ये 10 टक्के भागीदारीचा झुनझुनवाला-दमानी प्रस्ताव रिझर्व्ह बँकेच्या विचाराधीन असल्याचे वृत्त आहे. मात्र, अद्याप दोघांकडून अधिकृत दुजोरा व्यक्त करण्यात आलेला नाही. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने नुकतीच आरबीएलच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालकपदी योगेश दयाल यांची नियुक्ती केली आहे.
आरबीएलचे व्यवस्थापकीय संचालक विश्ववीर आहुजा सध्या वैद्यकीय रजेवर गेले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानंतर आरबीएल संचालक मंडळात फेरबदल करण्यात आले. संचालकपदी दयाल यांच्या नियुक्तीनंतर दुसऱ्याच दिवशी भागीदारी खरेदीचे वृत्त चर्चेत आले आहे.दरम्यान, झुनझुनवाला किंवा दमानी यांच्या वतीने कोणतेही अधिकृत पत्रक जारी करण्यात आलेले नाही. दरम्यान, आरबीएलच्या शेअर्सची पडझड दिसून आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राकेश झुनझुनवाला हे गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज मानले जातात. भारताचे वॉरेन बफे म्हणून त्यांची ओळख आहे. नवख्या गुंतवणूकदारांसोबतच मार्केटच्या नजरा झुनझुनवाला यांच्या स्ट्रॅटेजीकडे लागलेल्या असतात. बाजाराचा नफा व तोटा यांची अचू जाण झुनझुनवाला यांना आहे. व्यवसायाने सीए असलेले झुनझुनवाला यांनी वित्तीय संस्थांच्या संचालक मंडळात काम केले आहे. फोर्ब्सच्या सर्वाधिक भारतीय श्रीमंतांच्या यादीत त्यांनी 48 वे स्थान पटकाविले होते.
राकेश झुनझुनवाला आणि राधाकिशन दमानी यांची 10 टक्के हिस्सा विकत घेण्याची तयारी केल्याची चर्चा बॅंकिंग क्षेत्रात होत आहे. यामुळे बॅंक झुनझुनवाला आणि दमानी यांच्या ताब्यात जाणार का? याबाबत चर्चा होत आहेत. असे असताना दुसरीकडे रिझर्व्ह बॅंकेने परीपत्रक काढून आरबीएल बॅंकेची आर्थिक स्थिती चांगली असल्याची माहिती दिली आहे. बॅंकेकडे चांगले भांडवल असून आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही भीती बागळण्याची गरज नाही अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे.
ख्रिसमसच्या दिवशी रिझर्व्ह बँकेने मुंबईच्या 78 वर्ष जुन्या आरबीएल बँकेत बदल केले होते. खाजगी बँकेच्या मंडळावर अतिरिक्त संचालक म्हणून रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांना नियुक्त करण्यात आले आहे. आरबीएल बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने कारवाई करण्यापूर्वी झुनझुनवाला आणि दमानी यांनी विनंती केली होती. आरबीएल बँकेतील हिस्सा खरेदीबाबत आरबीआय सध्या झुनझुनवाला आणि दमानी यांच्या विनंतीवर विचार करत आहे. आरबीएलने बँकेचे एमडी आणि सीईओ विश्ववीर आहुजा यांना तात्काळ रजेवर पाठवण्यात आले असून त्यांच्या जागी कार्यकारी संचालक राजीव आहुजा यांना हंगामी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ बनवण्यात आले आहे.