अकलूज : अकलूजमध्ये ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी त्यांच्या झोपडीत जावून त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिटकडून साखर शाळेत जावून शिक्षणाचे धडे दिले.
ऊसतोड कामगार व त्यांची मुले म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो ऊसाचा फड व त्या फडातील पाचटवरती खेळणारी त्यांची मुले त्यांना ना कशाची भीती, ना उन व वारा, असे चित्र समोर येते. तीच मुले थोडी मोठी झाली की त्यांच्याही वाट्याला तेच काम येते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आपण पाहतो आज डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो. इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर होतो तसेच ऊस तोड कामगाराचा मुलगा ऊसतोड कामगार होत. हे चित्र कुठेतरी बदलले गेले पाहिजे हि आस मनात ठेवून सहकार महर्षि शंकरराव मोहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च , शंकरनगर – अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिटने एक पाऊल टाकले आहे.
विषेश श्रमसंस्कार शिबीराअंतर्गत ३० डिसेंबर २०२१ रोजी अकलूज परिसरातील ऊसतोड कामगार व त्यांच्या मुलांसाठी साखर शाळा जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी ऊसतोड कामगाराच्या पालकांना व मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले . तसेच त्या मुलांच्या इंग्रजी विषयाच्या ज्ञानामध्ये भर टाकण्याचे कार्य केले. तसेच मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचे देखील कार्य केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . इंद्रजीत यादव यांनी दिली.
या साखरशाळा जनजागृती अभियान यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल गोडसे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेमधील सर्व स्वयंसेवक यांनी काम पाहिले.