पुणे : पुण्यातील एका वरिष्ठ पदावरील माहिला पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरात ओढणीनं गळफास घेत आत्महत्या केली. आज शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच पोलीस प्रशासनाला धक्का बसला आहे.
शिल्पा चव्हाण असं आत्महत्या करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. त्या पुणे शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होत्या. त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.पुण्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असलेल्या सैन्यातील महिला अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
आज सकाळी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी यांना आणण्यासाठी घरी गेला होता. बराच वेळ झाल्यानंतरही त्या फोन उचलत नव्हत्या. त्यानंतर दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यांना एक मुलगा असून, तो गावी गेला होता. त्या घरी एकट्याच असल्याचे सांगण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शिल्पा चव्हाण या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरात ओढणीनं गळफास घेत आपले आयुष्य संपवले आहे. शिल्पा चव्हाण या पुणे शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होत्या. त्यांनी केलेल्या आत्महत्येची माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
शिल्पा चव्हाण यांनी लॉकडाऊनच्या काळात त्यांनी अनेक गरजू लोकांना मदतीचा हात देखील दिला होता. तसेच ‘ई- पास’ची जबाबदारी देखील त्यांनी समर्थपणे पार पाडली होती. अनेक दिवस त्यांनी भरोसा सेलमध्ये काम केलं होतं. शिल्पा चव्हाण या सध्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत होत्या. त्यांचा कामाच्या बाबतीत देखील दरारा होता. अशी देखील माहिती पोलीस खात्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
पोलिसांनी घटनास्थळाची कसून झडती घेतली, असून आत्महत्येच्या मुख्य कारणाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, शिल्पा चव्हाण या कर्तबगार पोलीस अधिकारी असल्याची देखील माहिती खात्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली आहे. मात्र, त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. या आत्महत्येमुळे हुरहुर व्यक्त केली जात आहे .