सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या माध्यमातून राणे विरुद्ध ठाकरे असा सामना पुन्हा पाहायला मिळाला. यात राणे यांनी बाजी मारली. या निवडणुकीत भाजपने १९ पैकी १० जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ ५ जागा मिळाल्या आहेत. अजून मतमोजणी सुरू आहे. मात्र, जिल्हा बँकेवर नारायण राणे यांचे वर्चस्व निर्माण झालं आहे. त्यामुळे कणकवलीत राणे समर्थकांनी जल्लोष केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत १९ जागांपैकी १५ जागांवर भाजपने म्हणजेच नारायण राणे गटाची सरशी आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने ४ जागांवर विजयी मिळविला आहे. दरम्यान खूनाच्या गुन्ह्यात पाेलिसांना हवे असलेले आमदार नितेश राणे यांनी समाज माध्यमांतून ‘गाडालाच’ इतकंच लिहून कणकवलीतील विजयावर भावना व्यक्त केल्या आहेत. राणे समर्थक त्यांच्या प्रतिक्रियेवर सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा देत आहेत.
आजचा विजय नारायण राणे यांच्या समर्थकांकडून मुंबईतील त्यांच्या बंगल्यावर देखील साजरा करण्यात येत आहे. तेथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत आहे. दुपारी नारायण राणे हे कणकवलीत जाणार असल्याचे वृत्त आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या १९ जागांसाठी काल मतदान झाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या १९ पैकी १४ जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी १० जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर ५ जागा महाविकास आघाडीला जिंकता आल्या आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. तर भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत.
या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या प्रक्रियेत त्याठिकाणी देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.
या निवडणुकीत ९८१ पैकी ९६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणी तीन राऊंडमध्ये आठ टेबलांवरती एकाच वेळी होत आहे. दुसऱ्या टप्प्यात महिला उमेदवारांची मतमोजणी केली जात आहे.
महाविकास आघाडीचे प्रमुख उमेदवार बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव झाला आहे. सावंत हे नारायण राणे गटाचे प्रमुख विराेधक मानले जातात. त्यांनी राणे गटाविराेधात निवडणुकीत रान पेटवलं हाेते. सावंत यांना विठ्ठल देसाई यांच्याकडून इश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून पराभव स्विकारावा लागला आहे.