सोलापूर / अक्कलकोट : अक्कलकोटला (akkalkot) लवकरच सहा महिन्यात (six monts) १०० फूट लांबी आणि ५५ फूट उंचीची अत्याधुनिक आकर्षक (attractive) अशी भव्य स्वागत कमान (Welcome command) उभारण्यात येणार आहे. पुणे (Pune) येथील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने ही कमान करुन देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रअण्णा देशमुख यांनी घेतला आहे.
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह (maharashtra) देशभरातून भाविक येतात. त्यांचे स्वागत आकर्षक कमानीने व्हावे, ही संकल्पना या पाठीमागे आहे. केवळ कमान उभारली जाणार नाही तर अक्कलकोटमध्ये ज्यावेळी भाविकांचा प्रवेश होतो, त्या चौकाचे सुशोभिकरण देखील या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे.
पुणे येथील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने (Sri Swami Samarth Pratishthan) गेल्या ३० वर्षांपासून (since 30 years) पुणे ते अक्कलकोट पायी पालखी सोहळा (Foot Palkhi Ceremony) सुरु आहे. त्यावेळी ही बाब प्रकर्षाने दिसून आल्यानंतर प्रतिष्ठानने हा निर्णय घेतला आहे. यावर सुमारे ३० लाख (30 lakh) रुपये खर्च अपेक्षित आहे. या अक्कलकोट शहरालगत सोलापूर रोडवर भव्य – दिव्य प्रवेशद्वार (Grand – the divine entrance) भाविकांचे लक्ष वेधून घेणार आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
१०० फूट लांबी आणि ५५ फूट उंच, संपूर्ण आर लसीसी बांधकाम, त्यात श्री स्वामी समर्थ, श्री दत्त महाराज (Shri Dutt Maharaj) आणि चोळप्पा महाराज यांच्या मूर्ती (Idol) असणार आहेत. इंडस्ट्रियल फायबरद्वारे या मूर्ती होणार असून त्याला १०० वर्ष ( 100 years) काही होणार नाही. या कामी अक्कलकोटच्या नगराध्यक्ष शोभा खेडगी यांनी पालिकेचा ठराव मंजूर करून दिला होता. या कमानीमुळे शहराच्या वैभवात आणि सौंदर्यात मोठी भर पडणार आहे.
स्वामी समर्थ प्रतिष्ठानने नगरपालिकेकडे रीतसर परवानगी (permission ) मागितली होती. त्यावेळी आम्ही कशाचाही विचार न करता तातडीने हा निर्णय चांगला असल्याने त्याला मंजुरी दिली. मंडळाने अक्कलकोट शहरासाठी सामाजिक बांधिलकी (Social commitment) दाखवली ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट असल्याचे गावचे नगरसेवक ( Corporator) बसलींगप्पा खेडगी यांनी सांगितलंय.
सगळ्या तीर्थक्षेत्राला (Shrine) आम्ही जाऊन आलो. अनेक ठिकाणी स्वागत कमानी होत्या. अक्कलकोटमध्ये मात्र पाहायला मिळाली नाही. त्यामुळे आम्ही स्वामींच्या गावी चांगली कमान ( Good bow) करायचा निर्णय घेतला. येत्या सहा महिन्यांत हे काम आम्ही पूर्ण करून देणार आहोत, असे राजेंद्रअण्णा देशमुख (अध्यक्ष, स्वामी समर्थ प्रतिष्ठान,पुणे) यांनी सांगितलंय.