मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत (mumbai) आज बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar ) व परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींकडून वकील गुणरत्न सदावर्तेच्या (gunratn Sadavartena) जागी वकील सतीश पेंडसे (satish pendse) यांची नियुक्ती केल्याची माहिती देण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर यावे, असे आवाहन (appealing) करण्यात आले.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांना हटवून आता त्यांच्याऐवजी दुसरे वकील एसटी कर्मचाऱ्यांची बाजू कोर्टात मांडणार आहेत. वकील सतीश पेंडसे यांच्याकडे आता युक्तिवाद (Argumentation) करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते स्वतः डिप्रेशनमध्ये (depression) आले असावेत, अशा शब्दांत यावेळी एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी सदावर्ते यांना टोला लगावला.
एसटी संपातील कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू झाल्यास कोणतीही कारवाई (action) केली जाणार नाही, अशी घोषणा (announcement) परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली आहे. कोणतीही भीती न बाळगता कामावर या, असे आवाहन त्यांनी केले आहे. ज्या संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची किंवा बडतर्फी पर्यंतची कारवाई करण्यात आलेली नाही. अशा (सुमारे ५५ हजार कर्मचारी) कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे! त्यांच्यावर एसटी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे परिवहन मंत्री (Minister of Transport) अनिल परब यांनी सांगितले.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
विलिनीकरणाबाबत समिती निर्णय घेईल, त्यासंदर्भातील अहवाल लवकरच येईल, असे ते म्हणाले. एसटीच्या कृती समितीची (ST staff committee staff) आज बैठक झाली. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अनिल परब व महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
एसटी कृती समितीच्यावतीने बोलताना सांगण्यात आलं की, शरद पवार आणि अनिल परब यांच्यात बैठक (meeting) पार पडली. कृती समितीच्या वतीने आम्ही काही मुद्दे मांडले आहेत पहिल्यांदा दोन महिने ( two months) संप (strike) सुरू आहे. संपाबाबत सविस्तर चर्चा झाली. सातवा वेतन आयोगासंदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिलंय. कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होतेय. निलंबित व बडतर्फ झालेल्यांना एसटी सुरू झाल्यावर निर्णय घेतला जाईल असं आम्हाला सांगितलंय.
बांधवांनो विचार करा, विलिनीकरणाची लढाई कोर्टावर सोपवूया आणि कामावर येवूया, असं आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आलं. एसटी कामगार सेनेच्या कार्याध्यक्षांनी सांगितलं की, सर्व कामगार सेनेच्या सभासदांना आवाहन करतो की, एसटी जगली तर आपण जगणार आहे. आपण सर्वांनी महामंडळाच्या कामावर रुजू व्हावं, एसटी सुरु करावी, आपल्यावर कारवाई होणार नाही, याची ग्वाही मिळाली आहे. जर तुम्हाला कोणता त्रास झाला तर आम्ही तुमच्यासाठी हजर राहू, असे म्हटलंय.