न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्क (New York) शहराच्या ब्रोंक्स भागातील एका 19 मजली इमारतीला लागलेल्या आगीत तब्बल 19 जणांचा मृत्यू (killed) झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. मृतांमध्ये तब्बल नऊ लहानग्यांचाही (children ) समावेश आहे. एका बिघाड झालेल्या हिटरमुळे (Due to a broken heater) तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. मात्र, काही वेळातच ही आग (fire) वरच्या आणि खालच्या मजल्यांवरही पसरली आणि संपूर्ण इमारत ( Building) धुरानं भरली.
जवळपास 19 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 9 मुलांचाही समावेश आहे. तर 63 हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली आहे.
न्यूयॉर्कमधील आतापर्यंतच्या सर्वात भीषण आगीच्या घटनांपैकी ही घटना असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान जखमी नागरिकांना शहरातील पाच वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतेय.
(At least 19 people have been killed and more than 63 injured in a fire caused by a broken heater in the United States)
सीएनएनच्या (CNN) रिपोर्टनुसार, (report) घटनास्थळी पोहोचलेले न्यूयॉर्कचे महापौर (Mayer) एरिक अडम्स म्हणाले की, न्यूयॉर्क शहरासाठी हा अत्यंत भयानक आणि दुःखाचा क्षण आहे. आगीची ही घटना या शहराला त्रास देत राहणार आहे. आगीत मोठ्या प्रमाणात लोक होरपळून मृत्यूमुखी पडल्याचेही त्यांनी सांगितले. तर जखमींपैकी 32 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
दरम्यान या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतेय. न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयाच्या पश्चिमेला असलेल्या 19 मजली अपार्टमेंटला (apartment) ही आग लागली होती. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अपार्टमेंटच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून ही आग पसरू लागली होती. या आगीची न्यूयॉर्कमधील सर्वात भीषण अपघातांमध्ये गणना (Counted in horrific accidents) केली जाईल, असे महापौरांनी सांगितले.
या आगीवर नियंत्रण (control) मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 200 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यावेळी इमारतीमध्ये अडकले अनेक नागरिक आपली सुटका करुन घेण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र सुटकेसाठी दुसरा कोणता मार्ग नसल्याने अनेकांनी खिडकीतून आवाज देत, हात हलवत मदतीसाठी याचना (Solicitation) केली.
इमारतीजवळ राहणाऱ्या जॉर्ज किंगने (George King) यांनी सांगितले की, या घटनेमुळे लोकांचा एकाचं गोंधळ (Confusion) उडाला होता. ते पुढे सांगतात की, ‘मी येथे 15 वर्षांपासून राहत आहे मात्र अशी घटना मी पहिल्यांदाच पाहिली आहे. मला इमारतीतून धूर निघताना दिसला. मोठ्या संख्येने लोक मदतीसाठी हाक (Call for help) देत होते. लोक खिडक्यांमधून हात हलवत होते.