पुणे : पुण्यातील डेक्कन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. हेअर स्पामध्ये (hair spa) तरुणीच्या मानेचा मसाज (massage) करताना तेथील कर्मचाऱ्याने लज्जास्पद कृत्य (Shameful act) केले. मंदार साळुंखे हा कर्मचारी (worker) हेअर स्पा करण्याबरोबरच असताना तरुणीच्या मानेचा मसाज करीत होता. त्यासाठी तिने मान (neck) वर केली असताना मसाज करताना त्याने तरुणीच्या ओठांचा किस घेतला. अंगाला जाणीवपूर्वक अश्लील वर्तन (Conscious obscene behavior) करत फिर्यादीच्या मनास लज्जा (shame) उत्पन्न होईल, असा आरोप (Allegations) आहे.
याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी (Deccan Police) मंदार साळुंखे या कर्मचार्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हडपसर (Hadapsar News) येथील एका २६ वर्षाच्या तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार फर्ग्युसन रोडवरील हेअर आर्ट येथे काल रविवारी ( Sunday ता. 9) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी हेअर स्पा करण्यासाठी हेअर आर्ट येथे गेली होती. तेथे काम करणारा मंदार साळुंखे हा तरुण फिर्यादीचे मानेचा मसाज करीत होता. त्यासाठी तिने मान वर केली असताना मसाज करताना त्याने फिर्यादी यांच्या ओठांचा किस (A kiss on the lips) घेतला.
नको तेव्हा हात लावून फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. डेक्कन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.
प्रसिद्ध हेअर स्टाईललिस्ट (Famous hairstylist) जावेद हबीब (Javed Habib) यांनी हेअरकट करताना महिलेच्या केसात थुंकल्याची घटना ही अशीच लज्जास्पद कृती होती. जावेद हबीबने माफी सोशल मीडियावरून महिलेची माफीही मागितली होती. या घटनेचा व्हिडीओ (video) सोशल मीडियावर (social media) प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. अनेक नेटकऱ्यांनी जावेद हबीबवर टीकाही केली होती.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
● लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास विरोध केल्याने तरूणीस मारहाण
आणखी एक पुण्यातील प्रकार समोर आला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationships) राहात असलेल्या तरुणीने शारीरिक संबंध (Physical contact) ठेवण्यास नकार दिल्याने तरुणाने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
यात हिंजवडी पोलिसांनी (hinjvadi police) तरुणाला अटक केली आहे. तरुण आणि तरुणी दोघेही शिक्षण घेत आहेत. योगेश्वर शशिकांत पगारे असं अटक करण्यात आलेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आरोपी योगेश्वर हा हॉटेल मॅनेजमेंटचं ( hotel management) शिक्षण घेत आहे. पीडित तरुणी बिझनेस मॅनेजमेंट (Business management) करत आहे, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली.
चार दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास योगेश्वरने तरुणीला मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत असं म्हणत विचारणा केली. तेव्हा, तरुणीने त्याला नकार दिला. यावरून त्यांच्यात वाद झाला. याच रागातून योगेश्वरने तरुणीला नॉन-स्टिकी तव्याने हातावर आणि पोटावर मारहाण केली.
मारहाणीनंतर आरोपी योगेश्वरने तरुणीला प्लास्टिक पेनने जखमी केल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेबद्दल तरुणीने कुटुंबातील व्यक्तींना सांगितले. यानंतर वडील आणि भाऊ आल्यानंतर योगेश्वर विरोधात तरुणीने हिंजवडी पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी योगेश्वरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. घटनेचा अधिक तपास (Investigation) सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे करत आहेत.