टेंभुर्णी : नवरा बायकोच्या (husband- wife) भांडणात मध्ये पडून दिराने वहिनीवर (daughter-in-law) चारित्र्याचा संशय (suspicion of character) घेवून धारधार शस्त्राने खुनी हल्ला (Murder attack) करुन वहिनीस जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना काल रविवारी (yesterday Sunday) (ता.९) सायंकाळी घडली.
ही घटना काल सायंकळी माढा तालुक्यातील दहिवली गावात घडली. अश्विनी रघुनाथ पोटरे असं खुनी हल्ल्यात जखमी (injured) झालेल्या महिलेचं नांव आहे. याबाबत दीर सुनिल चांगदेव पोटरे विरोधात टेंभुर्णी पोलीस (Tembhurni police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रघुनाथ चांगदेव पोटरे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. रघुनाथ यांच रविवारी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या घरी पत्नी अश्विनी सोबत भांडण झालं. हे भांडण सुरु असतानाच तेथे दीर सुनिल चांगदेव पोटरे आला व भांडणात मध्ये पडून त्यांनी वहिनी अश्विनीवर चारित्र्याचा संशय घेवून धारधार शस्त्राने तिच्या छातीवर (chest) वार केले.
● सोलापूर- पुणे हायवेवर शिवशाही बसवर दगडफेक
सोलापूर : कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शिवशाही बसवर ( Shivshahi bus) दगडफेक (stone throwing) करून काच फोडून (broken glass) वीस हजार रुपयाचे नुकसान केल्याची घटना शनिवारी ( दि.८ जानेवारी ) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सोलापूर – पुणे हायवे ( solapur- pune highway) रोडवरील केगाव ब्रिज जवळ घडली. याप्रकरणी समीर रशीद तांबोळी (वय-३२,रा. सहारा नगर,करमाळा) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी त्यांच्या ताब्यातील शिवशाही बस (क्रमांक एम.एच.१४. जीयु.२९३९ ) घेऊन सोलापूर ते पुणे असा प्रवास करत होते. त्यावेळी केगाव ब्रिजजवळ आले असता, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणाने एसटीच्या (st) समोरील काचेवर दगड मारून काच फोडून वीस हजार रुपयाचे नुकसान केले.
या दगडफेकीत चालक यांच्या चेहऱ्यावर जखम झाली. अज्ञात व्यक्ती तेथून पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास (Investigation) पोलीस नाईक कसबे हे करीत आहेत.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
● चोरट्याने घरासमोरून मोटारसायकल पळविली
सोलापूर : कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरासमोर लावलेली मोटरसायकल (motorcycle) चोरून नेल्याची घटना ३० ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान आदित्य नगर, आरटीओ ऑफिस (RTO office) जवळ विजापूर रोड, सोलापूर येथे घडली.
याप्रकरणी मजहर नासर सय्यद (४६,रा. आदित्य नगर,विजापूर रोड,सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस (vijappur naka police) ठाण्यात फिर्याद दिली. यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
६० हजार रुपये किमतीची मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या राहत्या घरासमोरून चोरून नेल्याचे फिर्यादी म्हटले आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस नाईक सोनार हे करित आहे.
● चार ठिकाणाहून पार्किंगला लावलेल्या दुचाकी गाड्यांची चोरी
सोलापूर : पार्किंगला लावलेल्या दुचाकी गाड्यांची चोरी दिवसेंदिवस शहरात वाढत आहेत. जुना पुना नाका येथील नाकोडा रेसिडेन्सी (nakoda residencies) झवर मळा येथे विशाल ब छोरलिया यांची एम.एच.१३ ,बी.एफ. ५२३८ ही मोटरसायकल पार्किंगमध्ये पार्क करून ठेवले असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फौजदार चावडी पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. शरणाप्पा धर्मांणा पुजारी (रा. इंदिरानगर , ७० फूट रोड सोलापूर), यांची काळा रंगाची एम.एच.१३ डी.डी.५१७१ ही बुलेट राहत्या घरी पार्क करून ठेवली असताना अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. सदर बाजार (sadar bazar) पोलिस ठाण्यात या विषयी गुन्हा दाखल झाला आहे.
युवराज महादेव कुंभार (रा.अरविंद धाम,मुरारजी पेठ,सोलापूर) यांची पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पार्किंग केलेली डिलक्स मोटरसायकल क्रमांक एम.एच.४५ .ए.जी.१२८१ अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमधून चोरून नेली. सदर बाजार पोलिस ठाण्यात या विषयी गुन्हा दाखल झाला आहे.
नितीन लक्ष्मण कोळी (रा.कोटणी नगर जुळे सोलापूर) यांनी आपल्या ताब्यातील जांभळ्या रंगाची डीलक्स मोटर सायकल क्रमांक एम.एच.१३.सी.आर.००२९ मोटरसायकल सम्राट मेडिकल (samrat medical) समोर नगर येथे पार्क करून ठेवले असताना अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. विजापूर नाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.