बंगळुरू : कर्नाटकच्या (karnataka) हावेरी जिल्ह्यात ( haHaveri district) बँकेने (Bank) कर्ज देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या व्यक्तीने (Angry man) बँकेला आग (fire) लावली. या घटनेनंतर पोलिसांनी (police) त्या व्यक्तीला अटक (arrested) केली असून, त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात जवळपास 12 लाखांचे (12 lakh) नुकसान झाले आहे.
कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील एका व्यक्तीने रविवारी ( Sunday ता. 9 ) बँकेला आग लावली. कर्ज अर्ज ( loan application) फेटाळण्यात आल्याने आरोपी (Accused) संतप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला बँकेतून कर्ज घ्यायचे होते, त्यासाठी त्याने बँकेत अर्ज केला होता. मात्र, बँकेने कागदपत्रांची पडताळणी (Verification of documents) केल्यानंतर त्याचा कर्ज अर्ज फेटाळला.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, त्याच्याविरुद्ध कलम 436, 477 आणि 435 अंतर्गत कागिनेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला कर्जाची गरज होती, त्यासाठी त्याने बँकेशी संपर्क (contact) साधला होता.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मात्र, बँकेने त्यांचा कर्ज अर्ज फेटाळला (Rejected) . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर कर्ज अर्ज फेटाळण्यात आला. बँकांकडून कागदपत्रे आणि इतर काही बाबींची छाननी केली जाते, त्यानंतरच कर्ज स्वीकारले (accepted) जाते. याप्रकरणी पोलीस आता आरोपीची चौकशी (inquire) करत आहेत.
कॅनरा बँकेच्या (canara bank) शाखेतून मुल्लाने कर्ज मिळवण्यासाठी अर्ज सादर केला होता. बँकेने त्याचा अर्ज फेटाळला कारण त्याचा CIBIL स्कोर कमी होता. कर्जाचा अर्ज फेटाळल्याने संतापलेल्या मुल्लाने बँकेची शाखा गाठली. त्यांनी खिडकी तोडून बँकेच्या कार्यालयात पेट्रोल टाकले. त्यानंतर त्यानी कार्यालयाला (office) आग लावली. ये-जा करणाऱ्यांनी धूर दिसला आणि पोलिस आणि अग्निशमन दलाच्या (Fire brigade) कर्मचाऱ्यांना खबर (news) दिली.
या आगीत 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पाच संगणक, पंखे, दिवे, पासबुक प्रिंटर (pass book prints), कॅश (cash) मोजण्याचे यंत्र, कागदपत्रे, सीसीटीव्ही, कॅश काउंटर नष्ट करण्यात आले. आरोपीला अटक करण्यात आली आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या संबंधित कलमांनुसार कागिनेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बँकेच्या आत आग लागल्याने ग्रामस्थांचे आग विझवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. हावेरी येथील अग्निशमन दलाने तातडीने गावात धाव घेत आग आटोक्यात आणली.