सोलापूर – दहावी, बारावीच्या पाल्यांचे एक्स्ट्रा क्लासेस किवा शिकवण्या सुरू ठेवण्यास हरकत नाही. पालकांनी आपापल्या पाल्यास व्यवस्थित काळजीसह क्लासेसला पाठवण्यास हरकत नाही, असे सुस्पष्ट मत नोंदवत खासगी क्लासेस व शाळा महाविद्यालयांना परवानगी (permission) देण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांना दिल्या. Tenth and twelfth classes will start in Solapur
कोरोना (corona) व ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या साथीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे ( Filling Guardian Minister Dattatraya) यांची भेट घेतली. त्याप्रसंगी त्यांनी ही सूचना दिली.
कोरोना प्रतिबंधात्मक शासनाने जाहीर केलेल्या सर्व अटी, शर्तींचे तंतोतंत पालन करावे व क्लासेस सुरू करावेत, अशी पुस्तीही पालकमंत्री भरणे यांनी जोडली. दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून दहावी व बारावीचे खासगी क्लासेस सुरू करण्याविषयी प्रोफेशनल्स टिचर्स असोसिएशनने (Professional Teachers Association) दोन दिवसांपूर्वी आमदार प्रणिती शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना निवेदन दिले होते.
पालकमंत्री सूचनासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
○ विना मास्क व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 803 जणांवर कारवाई , 4 लाख 77 हजार रुपयांचा दंड वसूल
पंढरपूर : मागील काही दिवसांत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिक पालन करीत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विना मास्क (without mask) फिरणाऱ्या नागरिकांवर तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने धडक कारवाई सुरु केले.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यामध्ये 10 ते 12 जानेवारी 2022 या कालावधीत तालुक्यात 803 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 4 लाख 77 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली. Action against 803 violators without masks and rules
गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
तालुक्यात विना मास्क फिरणाऱ्या 387 जणांवर व वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 446 जणांवर कारवाई करण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम (vikram kadam) यांनी सांगितलंय.
ही कारवाई पंढरपूर (Pandharpur) शहर पोलीस, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण व करकंब (Karkamb) पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली आहे.पोलीस निरिक्षक अरुण पवार, मिलींद पाटील, धनंजय जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु यांनी केली आहे. नागरिकांनी मास्क वापर करावा, सार्वजनीक ठिकाणी सामाजिक अंतर ठेवावे, व वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी (Subdivisional Police Officer) विक्रम कदम यांनी केले आहे.