मुंबई : राज्यातील 95 नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका (election), 2 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुका येत्या 18 जानेवारी रोजी होणार आहेत. तसेच सांगली-मिरज-कुपवाड (Sangli-Miraj-Kupwad) महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होत आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान (voting)) करण्यासाठी संबंधित मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी (Public holiday) देण्याचे सामान्य प्रशासन विभागाने (General Administration Department) जाहीर केले आहे.
राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली (Thane, Raigad, Ratnagiri, Sindhudurg, Pune, Satara, Sangli, Solapur, Nashik, Dhule, Ahmednagar, Jalgaon, Aurangabad, Jalna, Parbhani, Beed, Latur, Osmanabad, Nanded, Hingoli, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Nagpur, Wardha, Bhandara, Gondia, Chandrapur and Gadchiroli) जिल्ह्यांतील 95 नगरपंचायतींकरिता निवडणुका होत आहेत. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी 7 पंचायत समित्या आणि सांगली-मिरज-कुपवाडा या एका महानगरपालिकेच्या पोट निवडणुकांकरिता ही सावर्जनिक सुट्टी असेल, असं सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलं आहे.
ओबीसी जागांवरील निवडणुका पुढे ढकलण्यात येणार का ? याबाबत सर्वोच्च न्यायालयात येत्या 17 जानेवारीला सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर निवडणुकांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयावरच निवडणुका अवलंबून आहेत. दरम्यान गोवा आणि उत्तर प्रदेश राज्यातील निवडणुकांची तयारी सुरूच आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगालाही (State Election Commission) तयारी करणे क्रमप्राप्त असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही सावर्जनिक सुट्टी नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निम शासकीय कार्यालये, सावर्जनिक उपक्रम, बँका (bank) इत्यादींना ही सावर्जनिक सुट्टी लागू राहणार आहे. Holiday announced: Local body elections on January 18
मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी रोजी मतदान होईल. उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होईल. परंतु मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया (Bhandara and Gondia) जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर रोजी मतदान होणार होते.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोग कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला असून नऊ कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान संचालक (Director of Information and Technology) कार्यालयातही कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असल्याने निवडणूक तयारीच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. मात्र, तरीही कामकाज सुरू असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.