पुणे : पुणे महानगरपालिकेत ज्या ठिकाणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की झाली होती. त्याच ठिकाणी भाजपने त्यांचा शुक्रवारी (ता. 11 ) सत्कार केला होता. या प्रकरणी नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी आता भाजपच्या 350 ते 400 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या सत्कारासाठी परवानगी नसतानाही कार्यक्रम आयोजित केल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक युवा मोर्चा अध्यक्ष बापू मानकर , नगरसेवक दीपक पोटे, प्रदीप देसरडा, दत्ता खाडे या प्रमुख कार्यकर्त्यांसह जवळपास 350 जणांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Case filed against 350 activists including Pune BJP city president
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पुणे भाजपने मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत किरीट सोमय्यांचा सत्कार केला. मात्र भाजप कार्यकर्त्यांना हा सत्कार महागात पडला आहे. पुणे पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये (Pune Jumbo Covid Center) भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. याचा भांडाफोड करण्यासाठी ते पुण्यातील महानगरपालिकेत गेले होते.
नियम डावलून जमाव जमवल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या जवळपास 350 ते 400 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे मनपाच्या पायऱ्यांवर सत्काराला परवानगी नाकारूनही कार्यक्रम करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
□ असा झाला सत्कार
किरीट सोमय्या यांच्या पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवरील सत्काराच्या कार्यक्रमावर काँग्रेस आणि शिवसेनेने आक्षेप घेतला होता. त्यामुळे त्यांचा सत्काराचा कार्यक्रम हा भाजप कार्यालयात करण्याचं ठरलं होतं. पण पुणे महापालिका कार्यालय परिसरात शेकडो कार्यकर्ते किरीट सोमय्या यांच्या स्वागतासाठी आले. यावेळी तिथे गर्दीला नियंत्रण करणे हे पोलिसांपुढे मोठं आव्हान बनलं. यावेळी मोठा गोंधळ झाला.
पोलिसांना गर्दीला नियंत्रणात करणं अवघड होऊन बसलं होतं. तरीही अखेर सोमय्यांचा सत्काराचा कार्यक्रम तिथे पार पडला.किरीट सोमय्या या दरम्यान पालिका कार्यालयात गेले. त्यांनी पालिका आयुक्तांची कार्यकर्त्यांसह भेट घेतली. यावेळी पालिकेबाहेरील सर्व वातावरण भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजर आणि घोषणाबाजीने दणाणून सोडलं. शेकडो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गर्दी केलेली होती.