नवी दिल्ली : जवळपास 90 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. मात्र पाच राज्यातील निवडणुका संपल्यानंतर यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 95 डॉलर प्रति बॅरल आहेत. यात आणखी वाढ होऊ शकते. तर रशिया युक्रेनमध्ये युद्ध होण्याचीही भीती आहे. परिणामी भारतात यावर्षाच्या शेवटपर्यंत पेट्रोल 150 रुपये लिटर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रशिया कोणत्याही क्षणी युक्रेनवर हल्ला करु शकते, अशी माहिती अमेरिकेने दिली आहे. त्यासंदर्भातील घोषणा रशियाने केल्याचा दावाही अमेरिकेने केला आहे. रशिया कोणत्याही क्षणी युक्रेनवर हवाली हल्ले करण्याची शक्यता आहे, त्यामुळे युक्रेनमधून तत्काळ बाहेर पडा, अशा सूचना अमेरिकेने आपल्या नागरिकांना दिल्या आहेत. ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि नेदरलँडनेही आपल्या नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध अटळ मानलं जातंय. या युद्धाला कोणत्याही क्षणी सुरुवात होईल असं सांगितलं जात आहे. जर्मनीतील एका वर्तमानपत्राने युद्धाची निश्चित तारीख जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेपाठोपाठ आता इंग्लंडनेही त्यांच्या नागरिकांना युक्रेन सोडा असे स्पष्ट आदेश दिले आहेत. अमेरिका आणि इंग्लंड या दोन देशांनी त्यांच्या नागरिकांना असा आदेश दिल्याने युद्ध आता अटळ असून त्याला कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.
रशिया कोणत्याही क्षणी युक्रेनवर हल्ला करू शकतो, अशी भीती जगभरात पसरली असतानाच युद्ध थांबवण्यासाठी सुरू असलेली चर्चा सुद्धा निष्फळ ठरली आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयानुसार रशिया हल्ला करण्यासाठी बीजिंग ऑलिम्पिक संपण्याच्या भानगडीत पडणार नाही. War at any moment, declared! Petrol will be Rs 150 per liter
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
रशियाने युक्रेनच्या सीमेवर अडीज लाख सैनिक जमा केले आहेत. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो. रशियाने मात्र आपण हल्ला करणार नाही असं म्हटलंय. युक्रेन नाटोत सहभागी होण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रशियाने केला आहे. नाटोच्या आडून अमेरिका आणि त्यांचे मित्र देश रशियावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा रशियाला संशय आहे.
युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्याचा जमाव वाढत आहे. युद्ध टाळण्याच्या जर्मनी, रशिया, युक्रेन आणि फ्रान्सच्या प्रतिनिधींमधील चर्चेत तोडगा निघाला नाही. अशा परिस्थितीत बायडेन यांनी अमेरिकेच्या नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष युरोपमध्ये युद्ध सुरू करण्यापासून काही तास दूर आहेत. हा हल्ला कधीही सुरू होऊ शकतो, असे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे.
डझनभर लढाऊ ब्रिगेडसह सुमारे 1 लाख 30 हजार सैनिक युक्रेन Ukraine सीमेवर जमले आहेत. रशियन रणगाड्यांनी मागील गुरुवारी बेलारूसमध्ये सराव केला. तसेच, आपल्या सहा युद्धनौका काळा समुद्र आणि शेजारच्या अझोव्ह समुद्रात पाठवल्याचेही अमेरिकाने म्हटले आहे.
तिस-या विश्वयुद्धाच्या भीतीने अमेरिकेने कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमचे सैनिक युक्रेनला पाठवणार नाही असं म्हटलंय. तणावाच्या या परिस्थितीत पाश्चिमात्य देश सातत्याने तणाव निवळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्याला फारसं यश आले नाही.