नवी दिल्ली : भारत सरकारने आणखी ५४ मोबाइल ॲप्सवर बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेला धोकादायक ठरत असल्याने सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने ५४ हून अधिक चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या ॲप्सपासून भारतीयांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला धोका आहे, असे हा निर्णय जारी करताना अधिकाऱ्यांनी सांगितल. जून २०२० पासून सरकारने सुमारे २२४ चिनी ॲप्सवर बंदी घातली आहे.
ईकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे ॲप्स चीनसारख्या परदेशातील सर्व्हरवर भारतीयांचा गोपनीय आणि संवेदनशील डेटा ट्रान्सफर करत असल्याच्या कारणावरून इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने हे बंदी आदेश जारी केले आहेत. गुगलच्या प्ले स्टोअरसह टॉप ॲप स्टोअरनाही हे ॲप्लिकेशन ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “प्ले स्टोअरवर भारतात ५४ ॲप्स आधीच ब्लॉक करण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी Meity ने माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६९ अ अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर केला आहे. India bans 54 more apps; 224 apps banned so far
Govt of India to ban 54 Chinese apps that pose a threat to India’s security: Sources
— ANI (@ANI) February 14, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
भारताने पुन्हा एकदा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही चीनी ॲप्सवर बंदी घातल्याचे समोर आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक असणाऱ्या ५४ चीनी ॲप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. यामध्ये Sweet Selfie HD, Beauty Camera – Selfie Camera, Equalizer & Bass Booster, CamCard for SalesForce Ent, Isoland 2: Ashes of Time Lite, Viva Video Editor, Tencent Xriver, Onmyoji Chess, Onmyoji Arena, AppLock, Dual Space Lite, चा समावेश आहे. बंदी घालण्यात आलेल्या यापैकी बरेच अॅप्स Tencent, Alibaba आणि गेमिंग फर्म NetEase सारख्या मोठ्या चिनी तंत्रज्ञान कंपन्यांचे आहेत आणि २०२० पासून भारतात बंदी घालण्यात आलेल्या ॲप्सचे नामांतर केलेले किंवा दुसऱ्या ब्रँडच्या नावाखाली नव्याने लाँच केलेले आहेत.
मागे बंदी घातलेल्या ॲपमध्ये TikTok, Shareit, WeChat, Helo, Likee, UC News, Bigo Live, UC Browser, ES File Explorer आणि Mi Community सारख्या लोकप्रिय ऍप्लिकेशन्सचा समावेश आहे.