मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत धक्कादायक आरोप केले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात राज्यात सर्वात मोठा घोटाळा झाला होता, असे राऊत यांनी म्हटले आहे. महाआयटीत तब्बल 25 हजार कोटींचा घोटाळा फडणवीसांच्या काळात झाला, असे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच ठाकरे यांचे अलिबागमध्ये १९ बंगले आहेत, असा खोटा आरोप करण्यात आला आहे, असेही राऊत यांनी म्हटले.
मला जेलमध्ये टाका. पण माझ्या कुटुंबियांना, नातेवाईकांची सतावणूक कशासाठी? असा सवाल त्यांनी केला. हा ट्रेलर आहे यापुढे मी व्हिडिओ, क्लिप्स घेऊन येणार असल्याचा इशारा दिलाय.
दोन वर्षांपूर्वी भाजप नेत्यांच्या मुलीचे लग्न झाले. त्याला जंगलाचा सेट लावण्यात आला. आम्ही विचार केला, कोणाचाही शिरायचे घरात नाही. हे आमच्या मुलांवर आमच्या मुलींच्या लग्नाचा हिशोब विचारतात. माझ्या मुलीच्या लग्नात लावलेल्या नेलपाॅलीशचा खर्च तपास करते, माझ्या टेलरकडे ईडीने जावून मी किती कपडे शिवले याची माहिती घेते, हे ईडीचे काम आहे, असा सवालही त्यांनी केला. Raut’s allegation of biggest scam in Maharashtra during Fadnavis; BJP people are recovery agents of ED
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
किरीट सोमय्यांचा मुलगा पीएमसी घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानचा पार्टनर आहे. निकॉन इन्फास्ट्रक्चर कंपनी किरीट सोमय्यांची मुलाची आहे. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना तातडीने अटक करा. किरीट सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराच्या कागदपत्रे तीन वेळा मी ईडी कार्यालयात पाठविली आहेत. भाजपचे लोक ईडीचे वसुली एजंट बनलेत.
मदत केली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करु, अशी धमकी भाजपच्या नेत्यांनी मला दिली. मराठी भाषेला विरोध करणारे किरीट सोमय्या हे भाजपचे फ्रंटमॅन आहे. ते शिवसेनेच्या नेत्यांवर खोटे आरोप करीत आहेत. गुजरातमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला. गेली दोन वर्ष हा घोटाळा सुरु होता तेथे कारवाई का केली नाही.
कोण आहे अमोल काळे ? असाही सवाल संजय राऊत यांनी केला. सगळ्यांचे अकाऊंट्स लिंक्स, पैशांचे व्यवहार ज्यांच्याशी जोडले गेले आहे. पैसा कुठे, कुठे गेला आहे ? असाही सवाल राऊत यांनी केला. या घोटाळ्याशी संबंधित सर्व कागदपत्रे ही दोन दिवसात इकॉनॉमिक ऑफेन्स विंग आणि ईडीकडे जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. माझ्याकडे आता पाच हजार कोटींचा हिशोब माझ्याकडे आला आहे आणि तो हिशोब दोन्ही तपास यंत्रणांकडे जाणार आहे, असे राऊत म्हणाले.
भाजपचे प्रमुख नेते मला भेटले. त्यांनी मला हे सांगण्याचा प्रयत्न केला की, तुम्ही या सरकारमधून बाहेर पडा. आम्हाला हे सरकार घालवायचे आहे. काही आमदार आमच्या हाताशी लागत आहेत. तुम्ही आमचे सरकार येण्यासाठी मदत करा. तुम्ही मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील, अशी धमकी मला दिला. तुम्हाला पश्चाताप होईल, अशी धमकी भाजप नेत्यांनी मला दिली.