सोलापूर : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत अर्ज माघारच्या शेवटच्या दिवशी 87 पैकी 55 जणांनी अर्ज माघार घेतली. अखेर दूध संघाची निवडणूक लागली. इतर मागासवर्गीय प्रवर्गाची एक जागा बिनविरोध झाली असून मोहोळचे दीपक माळी यांना पुनश्च संधी मिळाली आहे. सुरेश हसापुरे यांच्या माघारीमुळे माळी यांचा मार्ग मोकळा झाला.
दिलीप माने यांच्या अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी होती मात्र त्यावर निकाल झाला नाही, शेवटी त्यांनी निकाल काहीही लागो मी निवडणूक लढवणार नाही, असे घोषित केले. उत्तर तालुक्याला एक जागा घेण्यात मात्र ते यशस्वी झाले आहेत.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी स्वतः आणि आपल्या सुनेचा अर्ज दाखल केला होता. महिलांमधून सुनेला दूध संघावर पाठवण्याचा त्यांचा प्रयत्न फेल झाला, अर्ज माघार घेण्याच्या दिवशी दुपारी चार नंतर त्यांनी माघार अर्ज पाठवला, मात्र तो निवडणूक निर्णय अधिकारी भोळे यांनी स्वीकारला नाही. Dudh Sangh election: 31 candidates in fray for 16 seats, Dilip Mane refuses to contest
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सत्ताधारी पॅनलचे 17 उमेदवार जाहीर करण्यात आले असून कपबशी या चिन्हाची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली आहे तसेच दूध संघ बचाव कृती समितीच्या वतीने रोड रोलर हे चिन्ह मागणी करण्यात आले आहे. शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर सत्ताधारी पॅनलचे 17 उमेदवार निश्चित करण्यात आले.
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळ निवडीसाठी जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघत आहे. दूध संघ बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसमधील श्रेष्ठींचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. दरम्यान दूध संघाच्या प्रारूप मतदार यादीतून वगळलेल्या संस्थांपैकी मोहोळ तालुक्यातील 47 दूध संस्थांचा समावेश अंतिम मतदार यादीत झाला आहे. त्यामुळे माजी आमदार राजन पाटील यांना दिलासा मिळाला आहे.
□ 16 जागेसाठी 31 उमेदवार रिंगणात
दूध संघाच्या निवडणुकीत आता 16 जागांसाठी 31 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यामध्ये सर्वसाधारण 12 जागांसाठी 20, महिला प्रवर्गाच्या 2 जागेसाठी 7, अनुसूचित जातीच्या 1 जागेसाठी 2, भटक्या विमुक्त 1 जागेसाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 27 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.