नवी दिल्ली : सीबीआयने एबीजी शिपयार्डचे माजी एमजी ऋषी कमलेश अग्रवाल आणि इतर संचालकांविरोधात लुकआऊट नोटीस जारी केले आहे. त्यांच्याविरोधात 28 बँकांना चुना लावल्याचा आरोप आहे. तब्बल 22,842 कोटींचा हा घोटाळा बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. यासंबंधी सर्व आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेकडूनही कर्ज घेण्यात आले होते.
फौजदारी कट रचणे, फसवणूक करणे, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, सरकारी मालमत्ता बळकावणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबीजी शिपयार्ड लिमिटेडचे माजी सीएमडी ऋषी कमलेश अग्रवाल आणि तत्कालीन कार्यकारी संचालक संथानम मुथुस्वामी आणि इतर तीन संचालक अश्विनी कुमार सुशील कुमार अग्रवाल आणि रवी विमल नेवातिया यांची आरोपी म्हणून नावे आहेत.
कोणत्याही आरोपीला देशातून पळून जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली जाते. लुकआऊट नोटिसमध्ये, तपास एजन्सी आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकारी, बंदरांचे अधिकारी आणि इतर देशांच्या सीमेवरील रस्त्यांवरील सुरक्षा दलांना आरोपींनी देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पकडण्याच्या सूचना दिल्या जातात.
एबीजी शिपयार्डप्रकरणी सीबीआयकडून सविस्तर प्रेस रिलीज जारी करण्यात आली आहे. या प्रकरणी संचालक ऋषी अग्रवाल आणि 8 आरोपींविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आली असून सर्व आरोपी भारतातच असल्याची माहिती आहे. Lime to 28 banks: ABG Shipyard Bank scam, lookout notice issued
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाचा मोठा खुलासा झाला होता, त्यामुळं आता सीबीआयनं एबीजी शिपयार्डचे संचालक आणि प्रमोटर्सविरोधात लुक आऊट नोटीस काढली आहे. हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा बँक घोटाळा आहे.
एबीजी शिपयार्डचे संचालक आणि प्रमोटर्स असलेले ऋषी अग्रवाल, संथानम मुथास्वामी, अश्वनी कुमार, सुशील कुमार अग्रवाल, रवि विमल नेवेटिया यांनी देश सोडून पळून जाऊ नये यासाठी सर्व सीमा अधिकाऱ्यांना सीबीआयकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, सीबीआयचे प्रवक्ते आरसी जोशी यांनी सांगितलं की, “आरोपी भारतात आहेत. सीबीआयनं आरोपींविरुद्ध लुक आऊट सर्क्युलर (एलओसी) आधीच काढले होते. यापूर्वी, स्टेट बँक ऑफ इंडियानं सन 2019 मध्ये मुख्य आरोपींविरुद्ध लूक आऊट नोटीसा काढल्या होत्या”
एबीजी शिपयार्ड, एकेकाळी भारतातील सर्वात मोठी खाजगी शिपयार्ड फर्म आहे. सीबीआयनं 28 बँकांची 22,800 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. देशातील आतापर्यंतचं हे सर्वात मोठं बँक फसवणूक प्रकरण आहे.