वेळापूर : वेळापूर, (ता. माळशिरस ) येथे पैशासाठी पिसेवाडीच्या शेत मजुराची निर्घृण हत्या झाली आहे. या बाबतीत वेळापूर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
भालचंद्र पोपट वाघ (वय ३८ वर्षे , रा . पिसेवाडी , ता. माळशिरस) असे मयत झालेल्याचे नाव आहे. पोलिसांत मयताचे वडील पोपट काशिनाथ वाघ ( रा. पिसेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून शिवाजी विजय गायकवाड ( रा.खंडाळी ), गणेश पाटील (रा . चव्हाणवाडी), रामकृष्ण शिवाजी वाघमोडे (रा . पिसेवाडी), राहुल माधवराव माने देशमुख (रा . शेरी नं . १ वेळापूर) यांच्यावर वेळापूर पोलिसांत भादवि ३०२, ३६४, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
नातू किशोर भालचंद्र वाघ याने सांगितले की काल मंगळवारी ( दि . १५) रात्री ९.३० वाजणेचे सुमारास गणेश पाटील (रा . चव्हाणवाडी) व रामकृष्ण शिवाजी बाघमोडे (रा . पिसेवाडी) यांनी त्याला व मयत वडील भालचंद्र पोपट वाघ यांना वेळापूर येथील निमगाव रोडजवळील पुलावरून वेळापूर येथील रिच कलेक्शन या कपड्याच्या दुकानात मोटार सायकलवरून आणले.
तेथे शिवाजी गायकवाड (रा . खंडाळी, ता. माळशिरस) हा माझ्या वडिलांना म्हणाला तू दोन दिवस कामाला का आला नाहीस , तू उचल घेतलेली राहिले पैसे आत्ताच्या आत्ता दे असे म्हणू लागला, त्यावेळी वडील त्यांना मी उद्यापासून तुमच्याकडे कामाला येतो असे म्हणाले. तेथे उभा असलेला राहुल माधवराव माने देशमुख (रा . शेरी नं . १ वेळापूर) याचे सांगणेवरून शिवाजी विजय गायकवाड व रामकृष्ण शिवाजी वाघमोडे यांनी प्लास्टीक पाईपने भालचंद्र वाघ यांना हातावर , पायावर , पाठीवर मारहाण केली. The brutal murder of a farm laborer of Pisewadi for money in Velapur
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
त्यावेळी शिवाजी गायकवाड यांनी मला तेथुन जाण्यास मी घाबरून तेथुन घरी आलो, असे माझा नातू किशोर याने मला सांगितले. त्यावेळी आमची खात्री झाली की मुलगा भालचंद्र पोपट वाघ यास या चौघांनी मिळून मारहाण केली. शेतमजुरीचे उचलीचे घेतलेले पैसे घेवूनही कामाला का आला नाही या कारणावरून प्लास्टीक पाईपने मारूण गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
□ सोलापुरात जुगार खेळताना शिक्षकासह चौघांना पकडले तर पाचजण फरार; पाटबंधारे विभागाच्या जागेत जुगाराचा खेळ
सोलापूर : जुगाराची चटक ही उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू पेशालाही सोडत नाही. नविन पिढी घडवण्याचे काम करणारे शिक्षक ही या जुगाराच्या आहेरी गेले आहेत. अशा काही मोजक्याच महाभागांमुळेच शिक्षक पेश्याला काळीमा फासली जात आहे. हा प्रकार सोलापुरात घडला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात एका झेडपी शिक्षकासह ४ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. इतर ५ जण मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. यात ९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पळून जाणाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत.
या कारवाईत २ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, कचरेवाडी येथे दिलीप रामचंद्र मेटकरी यांच्या घरासामोर पाटबंधारे विभागाच्या जागेत काही लोक पत्त्याच्या पानावर पैसे लावून जुगार खेळत असल्याने तेथे छापा टाकला. यावेळी तेथे काही लोक जुगार खेळताना मिळून आले.
यामध्ये दिलीप रामचंद्र मेटकरी (वय ६४), दत्तात्रय श्रीमंत आवळेकर (वय ४२), दत्तात्रय अंकुश माने, सीताराम मोहन फटे (वय ५४, सर्व रा. कचरेवाडी, ता. मंगळवेढा) यांना जागीच पकडले. तसेच पळून गेलेल्यांमध्ये उमेश उत्तम गवळी (रा. भालेवाडी), बबलू सीताराम शिंदे, लाला काळुंगे, महीपती अंकुश माने, पिंटू माने (सर्व रा. कचरेवाडी) यांचा समावेश आहे. त्यांच्यासमोर पत्त्याची पाने, रोख १५ हजार ५५० रुपये, चार मोटारसायकली व तीन मोबाईल असा २ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, सहायक पोलीस निरीक्षक आमोल बामणे, उपनिरीक्षक विजय वाघमारे, पोहेकॉ. महेश कोळी, पो.ना. विठ्ठल कोळी, पो.कॉ. सोमनाथ माने, पोकॉ मळसिद्ध कोळी व चालक पो.काॅ. समाधान यादव यांनी पार पाडली.