सोलापूर : मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात तीन मित्रांचा दुर्देवी मृत्यू झाला. सोलापुरातील या मित्रांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. स्मशानभूमीत एकाचवेळी तीन मित्रांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातात गौरव खरात, सौरव तुळसे आणि सिद्धार्थ राजगुरू यांचं निधन झालं. दरम्यान, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना भेटण्यासाठी जात असताना अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ट्रक आणि टेम्पोच्या मध्ये सापडून कारचा चुराडा झाला होता. यात कारमधील चौघांचा मृत्यू झाला. सर्व मृतदेह खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. गौरव खरात (३६), सौरभ तुळसे (३२), सिद्धार्थ राजगुरू (३१, सर्व रा. सोलापूर) असे सोलापुरातील तीन तर मयुर दयानंद कदम हा ही त्यात मयत झाला. हा तुळजापुरातला होता.
मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर खोपोलीजवळ अपघातात मृत पावलेल्या गौरव खरात, सौरभ तुळसे, सिध्दार्थ राजगुरूयांची आज फॉरेस्ट येथील घरापासून एकत्रित अंतयात्रा निघाली. या परिसरातील प्रत्येक घरातील व्यक्ती विशेषत: तरूण आणि महिला हळहळ व्यक्त करीत या अंतयात्रेत सहभागी झाले होते. Funeral of three friends started simultaneously in Solapur
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
फॉरेस्ट भागातील बुध्द विहार नजीकच या तिघांची घरं आहेत. एक्स्प्रेस वे वर मंगळवारी आला. सकाळी झालेल्या अपघातात स्विफ्ट कार मधून निघालेले चौघेजण ठार झाले होते. अन्य एक मयुर कदम हा तुळजापूरचा रहिवासी आहे. या सर्वांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह सोलापूरला आणण्यात आले. यांचा मृतदेह तुळजापूर येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
आज सकाळी सकाळी सहा वाजल्यापासूनच फॉरेस्ट भागात नागरिकांची या तिनही कार्यकर्त्यांना साश्रुनयनांनी श्रध्दांजली वाहण्यासाठी गर्दी झाली होती. आपल्याच घरातील एखादा व्यक्ती गेला आहे अशी हळहळ प्रत्येक कुटुंबात दिसत होती.
अंतयात्रा सकाळी १० च्या सुमारास निघाली. या वेळी परिसरातील नागरिकांबरोबरच सोलापूर नागरिकांबरोबरच शहरातील विविध पक्षातील विविध भागातील कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. मोदी स्मशानभूमीत अंतयात्रा ११ च्या सुमारास पोहोचली आणि तिथे अंत्यविधी पार पडला.