बार्शी : जमीनीबाबत सुरु असलेल्या न्यायालयीन वादावरुन दोघांना मारहाण झाल्याची घटना येथील न्यायालय परिसरात घडली आहे.
याबाबत जखमी संजय विलास आरगडे (रा. तावडी ता. बार्शी) याने दिलेल्या फिर्यादीवरुन पिंटू गव्हाणे, दत्तात्रय ढेरे व अनोळखी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय आरगडे यांची आई विश्रांता उर्फ छबन व आईची आजी चंपावती राऊत या दोघीमध्ये मागील दीड वर्षापासुन जमीनीवरून बार्शी न्यायालयात वाद चालु आहे.
त्याची सुनावणी असल्याने ते आपला गावातील मित्र सुरज बाळासाहेब आरगडे यासह सकाळी 11:30 वाजता बार्शी न्यायालयात आले होते, त्या वेळी चंपावती राऊत याचे तर्फे पिंटु गव्हाणे व दतात्रय ढेरे हे दोघे आले होते. दुपारी 01:30 वा. चे सुमारास ते दोघे न्यायालय आवारात उभे असताना पिंटु गव्हाणे, दतात्रय ढेरे व इतर दोन अनोळखी इसम त्यांचे जवळ आले व समोर असलेल्या संकेश्वर बागेत जावुन आपण शेतजमीन विषयी चर्चा करू, असे म्हणाल्याने ते बागेत गेले.
तिथे पिंटु गव्हाणे याने, तु कोर्टात दावे दाखल करतो, तुला लय माज आला आहे का, तुला तावडी वरून इथे यायचे आहे, आम्ही इथले वतनदार आहोत असे म्हणून पोटात लाथ मारली. त्यामुळे ते खाली पडताच दत्तात्रय ढेरे यांने पिशवीतून एक पुडी काढली व त्या पुढीतील चटणी अंगावर फेकली, तेव्हा सुरज हा त्यांना सोडवण्यास आला असता दोन अनोळखी इसमांनी त्यास पकडले व हाताने मारहाण केली, तेंव्हा ढेरे याने तेथे पडलेले लाकडी दांडके उचलुन पाठीत मारले. The two were beaten in the Barshi court premises over a land dispute
तेंव्हा पिंटु गव्हाणे यांने त्याचे पॅटच्या आतून एक कुकरी काढली व ती मारू लागला, तेव्हा सुरज हा वाचवण्यास आला असता त्याचे उजव्या हातास वार झाला. आरोपी ओरडा ओरड करून बोलवा रे आपली आणखी पोरं बोलवा, आज यांना जीवे ठार मारू असे म्हणाल्याने ते त्यांचे तावडीतून निसटून तेथून पळून गेले.
□ सोलापुरात जुगार खेळताना शिक्षकासह चौघांना पकडले तर पाचजण फरार; पाटबंधारे विभागाच्या जागेत जुगाराचा खेळ
सोलापूर : जुगाराची चटक ही उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू पेशालाही सोडत नाही. नविन पिढी घडवण्याचे काम करणारे शिक्षक ही या जुगाराच्या आहेरी गेले आहेत. अशा काही मोजक्याच महाभागांमुळेच शिक्षक पेश्याला काळीमा फासली जात आहे. हा प्रकार सोलापुरात घडला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात एका झेडपी शिक्षकासह 4 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले.
इतर 5 जण मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. यात 9 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पळून जाणाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या कारवाईत 2 लाख 7 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, कचरेवाडी येथे दिलीप रामचंद्र मेटकरी यांच्या घरासामोर पाटबंधारे विभागाच्या जागेत काही लोक पत्त्याच्या पानावर पैसे लावून जुगार खेळत असल्याने तेथे छापा टाकला. यावेळी तेथे काही लोक जुगार खेळताना मिळून आले.
यामध्ये दिलीप रामचंद्र मेटकरी (वय ६४), दत्तात्रय श्रीमंत आवळेकर (वय ४२), दत्तात्रय अंकुश माने, सीताराम मोहन फटे (वय ५४, सर्व रा. कचरेवाडी, ता. मंगळवेढा) यांना जागीच पकडले. तसेच पळून गेलेल्यांमध्ये उमेश उत्तम गवळी (रा. भालेवाडी), बबलू सीताराम शिंदे, लाला काळुंगे, महीपती अंकुश माने, पिंटू माने (सर्व रा. कचरेवाडी) यांचा समावेश आहे. त्यांच्यासमोर पत्त्याची पाने, रोख १५ हजार ५५० रुपये, चार मोटारसायकली व तीन मोबाईल असा २ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, सहायक पोलीस निरीक्षक आमोल बामणे, उपनिरीक्षक विजय वाघमारे, पोहेकॉ. महेश कोळी, पो.ना. विठ्ठल कोळी, पो.कॉ. सोमनाथ माने, पोकॉ मळसिद्ध कोळी व चालक पो.काॅ. समाधान यादव यांनी पार पाडली.