सोलापूर : एका ३४ वर्षीय महिलेचा विनयभंग व अपहरण केल्याबद्दल नगरसेवक मनोज शेजवाळ यांच्यासह चौघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून नगरसेवक शेजवाळसह दीपक राजगुरू, किरण राजगुरू व आकाश सनके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिलेच्या साडीचा पदर ओढत तिला जबरदस्तीने विषारी रसायन पाजत, तिला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी नगरसेवक मनोज शेजवाल याच्यासह चौघांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीनुसार पीडित महिलेच्या पतीचे आणि आरोपी दीपक राजगुरू यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजी ती महिला किराणा साहित्य म्हणाला. आणण्यासाठी दुकानात जात असताना तेथील झाडाजवळ एका कारमध्ये शेजवाल हा बसला होता. त्याच्यासोबत दीपक राजगुरू, किरण राजगुरू व आकाश सनके हे बसले होते. Four persons, including a corporator, were abducted and molested in Solapur
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
महिलेचा दीर किराणा साहित्य आणण्यासाठी दुकानात गेला होता. त्याला आणखी साहित्य आणायचे आहे हे सांगण्यासाठी पीडित महिला दुकानाकडे जात असताना शेजवाल याने पीडित महिलेला बोलवले. पीडित महिला आरोपी शेजवाल याच्याजवळ गेल्यानंतर तो म्हणाला, ‘तुझा नवरा तेथे थांबलेला आहे. काही दिवसांपूर्वी राजगुरूसोबत झालेले भांडण मिटवायचे आहे, तू चल,’ असे म्हणाला. त्या दरम्यान, गाडीमध्ये बसलेला आरोपी किरण राजगुरू याने पीडितेचा हात धरून तिला ओढत गाडीमध्ये बसवले. त्यावेळी महिला आरडाओरड करीत असतानाही आरोपींनी गाडीचे दार बंद करीत गाडी सुरू केली.
त्यावेळी तेथे उपस्थित असलेला आकाश सनके हा महिलेला शिवीगाळ करीत होता, तर आरोपी शेजवाल हा पीडितेचा पदर ओढत होता. दरम्यान, काही मिनिटांत गाडी एका ठिकाणी थांबली. त्यावेळी आरोपी नगरसेवक याने पीडितेच्या नरडे पकडत आपल्या खिशातील औषधाची बाटली काढून ती पीडितेच्या तोंडात ओतली. यामुळे महिला बेशुद्ध झाली. त्यानंतर त्या शासकीय रुग्णालयात नेल्यावर तिला शुद्ध आली, असे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून आरोपी मनोज शेजवाल, दीपक राजगुरू, किरण राजगुरू आकाश सनके यांच्यावर विनयभंगाच अपहरणाचा आणि जिवे मारण्याच प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाख झाला आहे. पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.