ठाणे : डोंबिवलीत गॅस सिलेंडर वितरणाचे काम करणाऱ्या दिपक निकाळजे (वय 27) याला धमकी आणि मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार संजय दत्त अडचणीत सापडले आहेत. दत्त यांनी दिपकला ‘तुला घरातून उचलून घेऊन जाईल, तू माझं भीषण रूप पाहिलेलं नाही मी कोणत्याही थराला जाऊ शकतो’ अशी धमकी दिली होती. तसेच दत्त यांच्या सांगण्यावरून तिघांनी दिपकला मारहाण केली. त्यामुळे दत्त आणि अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वीही गॅस सिलिंडर सप्लायरला मारहाण केल्याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. चार महिन्यांत हा दुसरा गुन्हा माजी आमदार दत्त यांच्यावर दाखल झाला आहे.
कल्याण पूर्वेत राहणारा दिपक निकाळजे हा गॅस एजन्सीमध्ये सिलिंडर वितरणाचे काम करतो. दोन तीन महिन्यांपूर्वीच त्याने दत्त यांच्याकडील काम सोडले आहे. त्यानंतर आमच्या माणसांना धमकावतो असा आरोप करीत दत्त यांनी दिपक याला रविवारी सकाळी धमकी दिली. त्यानंतर सायंकाळी माणसे पाठवून जबर मारहाण केल्याचा आरोप दिपक यांनी केला आहे. मला घरातून उचलून घेऊन जाईन. तू माझे भीषण रूप पाहिलेले नाहीस. Sanjay Dutt, who threatened the youth, reacted with difficulty
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मी कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी धमकी दत्त यांनी मोबाइलवरून दिल्याची आणि दत्त यांच्या सांगण्यावरून तीन अनोळखी व्यक्तींनी मारहाण केल्याचे दिपक यांनी दाखल तक्रारीत म्हटले आहे.
यापूर्वीही गॅस सिलिंडर सप्लायर राज यादव याला केलेल्या कामाचा हिशोब मागितले, तसेच खर्चासाठी पैसे मागितले म्हणून मारहाण केली होती. यावरुन नोव्हेंबर महिन्यात विष्णूनगर पोलिस ठाण्यात दत्त यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यामुळे दत्त यांच्याविरोधात हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात दीपक यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दखल केला आहे. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे , मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळू वंजारी या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
या प्रकाराबाबत बोलताना माजी आमदार दत्त यांनी आपली प्रतिक्रिया दिली. माझ्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली आहे. दीपक निकाळजेकडून जादा पैसे उकळले जात असल्याबाबत अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या. यात आमच्या गॅस एजन्सीची बदनामी होत होती. त्यामुळे यापूर्वीच त्याला कामावरून काढून टाकले आहे. मात्र तो आता आमच्या अन्य कामगारांना काम करू नका, असे दम देऊ लागला. त्याबाबत त्याला समजावले असता त्याने खोटी तक्रार दिल्याचे माजी आमदार दत्त यांनी सांगत निकाळजे याचे आरोप फेटाळले आहेत.