अमरावती : दहावी-बारावीची ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असताना दुसरीकडे प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पुणे-नाशिक महामार्गावर एका टेम्पोला अचानक आग लागली. संगमनेरमधील चंदनापुरी घाटात ही घटना घडली. टेम्पोच्या मागच्या बाजूने आग लागली. या आगीमध्ये दहावी आणि बारावीच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे पुणे बोर्डाचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतरच पंचनामा करू अशी माहिती संगमनेर पोलिसांनी दिली.
दहावी-बारावीची ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. देशातील सर्व बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र अशा प्रकारची याचिका दिशाभूल करणारी आणि विद्यार्थ्यांना खोटी आशा दाखवणारी आहे, असे कोर्टाने म्हटले. त्यामुळे आता ठरलेल्या वेळापत्रकानुसार दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. 10 – 12 exams will be held offline, on the other hand, burn the question papers
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
अहमदनगर – नगर-पुणे महामार्गावर चंदनापुरी ( ता. संगमनेर, जि. अहमदनगर ) परिसरात 12वीच्या प्रश्नपत्रिका पुण्याला घेऊन चाललेला एका टॅम्पोला आग लागली. यात बऱ्याचशा प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या तर उर्वरित प्रश्नपत्रिका आग विझविताना खराब झाल्या आहेत.
मध्यप्रदेशातील भोपाळ येथून पुण्याला निघालेला टॅम्पो ( क्रमांक एम 36, एच 0795 ) या चालत्या वाहनाला अचानक आग लागली. ही बाब टॅम्पो चालक मनीष चौरसिया व व्यवस्थापक रामविलास राजपूत यांना समजली. त्यांनी प्रसंगावधान राखत टॅम्पो रस्त्याच्या कडेला घेतला. त्यामुळे कोणतीही जीवित हाणी झाली नाही. आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग विझत नव्हती. स्थानिक नागरिकांनी घारगाव पोलिस ठाणे व महामार्ग पोलिसांना कळविले. त्यानुसार पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले.
अग्निशमन बंबांनी आग विझविली. मात्र यात कागदपत्रे मोठ्या प्रमाणात जळाले. उर्वरित कागद पत्रे खराब झाली. ही कागदपत्रे कशाची आहेत असे पोलिसांनी चौकशी करता वाहन चालकाने पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका असल्याचे सांगितले. पुणे बोर्डातील अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यांना घटनास्थळी येण्यास सांगितले. त्यानुसार पुण्यातून बोर्डाचे अधिकारी चंदनापुरी घाटात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुणे बोर्डाचे अधिकारी घटनास्थळी आल्यावर पंचनामा करू अशी माहिती संगमनेर पोलिसांकडून देण्यात आली आहे.