सोलापूर – एका अल्पवयीन मुलीला खायला देतो असे सांगून दुचाकीवर पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दयानंद काशिनाथ शेंडगे (वय २९ रा. होटगी स्टेशन,ता.दक्षिण सोलापूर) या विवाहीत तरुणाला १४ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा विशेष न्यायाधीश यु.एल.जोशी यांनी नुकतीच ठोठावली. तसेच पीडित मुलीच्या पुनर्वसनासाठी एक लाख रुपये भरपाई देण्याच्या आदेश विधी सेवा प्राधिकरणास निकालातून दिला आहे.
दिनांक ७ मे २०१८ रोजी सकाळच्या सुमारास आरोपी दयानंद शेंडगे हा त्याच्या ओळखीतील एका १२ वर्षीय मुलीला खायला देतो असे सांगून तिला दुचाकीवरून पळवून नेऊन तिला एका पडीत रानात नेला. आणि तिला मारहाण करीत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.तसेच याची वाच्यता केल्यास तिला ठार मारण्याची धमकी दिली होती.
या घटनेची फिर्याद पिडीतेच्या नातेवाईकांनी कामती पोलिसात दाखल केली होती. तत्कालीन सहाय्यक निरीक्षक के.टी.उंदरे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
या खटल्यात सरकारतर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये मुळ फिर्यादी आणि पीडितेची साक्ष तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल आणि सरकार पक्षाने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला १४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. Sexually abused girl sentenced to 14 years hard labor
या खटल्यात सरकार तर्फे ॲड प्रकाश जन्नू, ॲड शितल डोके, ॲड शैलजा क्यातम तर आरोपीतर्फे ॲड आर.बी. बायस यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून महिला कॉन्स्टेबल पूजा कोळी यांनी सहकार्य केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ हातभट्टी दारूवर कारवाई
सोलापूर – शहर परिसरात हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या आणि बाळगणाऱ्यांवर विविध पोलीस ठाण्याकडून कारवाई करण्यात आली.
विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोरेगांव बस स्थानकाजवळील किरण हॉटेलच्या मागील घराच्या आडोशाला नेताजी देवप्पा खडाखडे (वय 52, रा. कोळीगल्ली लक्ष्मी मंदिर जवळ सोरेगांव सोलापूर), लिंगराज भिमण्णा भरले (वय 31, रा. वडार गल्ली सोलापूर) या दोघांनी त्यांच्या जवळ 750 रूपये किंमतीची साडेसात लिटर हातभट्टी विक्रीच्या दृष्टीने बाळगली होती. त्यांच्या विरूध्द पोलीस नाईक महेंद्र लक्ष्मण गायकवाड यांनी फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस नाईक भद्रशेट्टी करीत आहेत.
सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौलाली चौकातील लिंबाच्या झाडालगत मोकळ्या जागेत रफिक इस्माईल शेख (वय 45, रा. मौलाली चौक मिल्लत मोहल्ला अडकी किराणा दुकाना बाजुला सोलापूर)याने त्याच्या जवळ 1 हजार 500 रूपयाची 30 लिटर हातभट्टी दारू बाळगून विक्री करीत असताना मिळून आला त्याच्या विरूध्द पोलीस नाईक विनायक नंदकुमार बर्डे यांनी फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस हवालदार नदाफ करीत आहेत.
त्याचबरोबर जेलरोड हद्दीत 70 फुट रस्त्यावरील भाजी मार्केट जवळील मोकळ्या जागेत यल्लप्पा विठ्ठल रच्चा (वय 50, रा. शिंदे पान शॉप जवळ न्यु पाच्छा पेठ साईबाबा महालक्ष्मी नगर सोलापूर), रमेश राठोड (रा. मुळेगांव तांडा सोलापूर) या दोघांकडून 1 हजार 500 रूपयाची 30 लिटर हातभट्टी दारू मिळून आली त्यांच्या विरूध्द पोलीस शिपाई अभिजित माधव धायगुडे यांनी फिर्याद दिली पुढील तपास महिला पोलीस नाईक बिराजदार करीत आहेत. तसेच कुचन नगर साईबाबा चौकातील मोकळ्या जागेत वासुदेव नारायण चारगुंडी (वय 55, रा. दत्त नगर सोलापूर) याने त्याच्या जवळ 1 हजार रूपयाची 20 लिटर हातभट्टी दारू बाळगून विक्री करीत असताना मिळून आला त्याच्या विरूध्द पोलीस नाईक विनायक बर्डे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस नाईक माने करीत आहेत.