नवी दिल्ली/ मुंबई : आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने गुरुवारी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयपीएल 2022 ची सुरुवात 26 मार्चपासून होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने मुंबई आणि पुण्यातील मैदानांवर खेळले जाणार आहेत. यातील 55 सामने मुंबईतील वानखेडे मैदान, ब्रेबॉन आणि डी. वाय. पाटील मैदानात होतील. तर इतर 15 सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर खेळले जाणार आहेत.
26 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे. तर 29 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. गुरुवारी झालेल्या आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलचा 15 वा हंगाम भारतामध्ये कोरोना नियमांचे पालन करुन होणार आहे. लीग स्पर्धेत 70 सामने होणार आहेत. हे सर्व सामने मुंबई आणि पुणे येथील चार ठिकाणी होणार आहेत.
मुंबईतील वानखेडे मैदानावर 20, ब्रेबॉन मैदानावर 15, डीवाय पाटील मैदानावर 20 आणि पुण्यातील मैदानावर 15 सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघाला समान संधी मिळेल यासाठी बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, प्रत्येक संघाचे चार चार सामने वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडिअम या मैदानावर होणार आहे. तर प्रत्येक संघाचे तीन तीन सामने ब्रेबॉन आणि पुणे मैदानावर होणार आहेत. प्रत्येक संघ लीग स्टेजमध्ये 14 सामने खेळणार आहे. त्यामध्ये पाच संघाविरोधात प्रत्येक संघाला दोन तर चार संघाविरोधात एक एक सामना खेळावा लागणार आहे.
प्रत्येक संघ आपल्या ग्रुपमधील इतर चार संघाविरोधात प्रत्येकी दोन सामने खेळेल. तसेच दुसऱ्या ग्रुपमधील एका संघाबरोबर दोन सामने खेळणार आहे. तर दुसऱ्या ग्रुपमधील इतर संघाबरोबर प्रत्येकी एक एक सामना खेळावा लागेल. IPL from March 26, all matches in Maharashtra
The 10 IPL teams will be divided into two groups for a total of 74 matches in the 2022 edition that will also include the playoffs and final.
Here are the two groups (ranked according to the number of titles they've won) pic.twitter.com/olEPPQxSqR
— KSR (@KShriniwasRao) February 25, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
उदा. ग्रुप अ मध्ये मुंबई कोलकाता, राजस्थान, दिल्ली आणि लखनौ या संघाबरोबर प्रत्येकी दोन सामने खेळेल. तर ब ग्रुपमधील चेन्नई संघाबरोबर दोन सामने खेळणार आहे. ब ग्रुपमधील इतर संघाविरोधात मुंबई प्रत्येकी एक सामना खेळणार आहे. याचप्रमाणे ग्रुप बी मध्ये आरसीबीचा संघ चेन्नई, हैदराबाद, पंजाब आणि गुजरात या संघाबरोबर प्रत्येकी दोन सामने खेळेल. तर ग्रुप अ मधील राजस्थान संघाविरोधात दोन सामने खेळेल अन् इतर संघाविरोधात प्रत्येकी एक एक सामना खेळणार आहे.
लीग स्पर्धेत मुंबईचे प्रत्येकी दोन सामने कोलकाता, राजस्थान, दिल्ली, लखनौ आणि चेन्नई या संघाविरोधात होणार आहेत. तर हैदराबाद, आरसीबी, पंजाब आणि गुजरात यांच्याविरोधात एक एक सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सने ट्विट करत स्पर्धेत आपले सामने कुणाबरोबर होणार आहेत, याची माहिती दिली आहे. लीग स्पर्धेत प्रत्येक सघाचे 14 सामने होणार आहेत. लीग स्पर्धेतून चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. मुंबई इंडियन्स संघाची कमान रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. पण मेगा लिलावामुळे संघात अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेत बरेच बदल पाहायला मिळणार आहेत.
मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, सुर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना रिटेन केले आहे. तर इशान किशन याला 15 कोटी रुपये मोजून पुन्हा एकदा आपल्या संघात घेतले आहे.
○ ग्रुप अ –
मुंबई, कोलकाता, राजस्थान, दिल्ली
लखनौ
○ ग्रुप ब
चेन्नई, हैदराबाद , बंगळुरु, पंजाब
गुजरात