मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. मुंबई येथील आझाद मैदानात संभाजीराजे आमरण उपोषणाला सुरूवात करत त्यांनी आर या पारची भूमिका घेतली आहे. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यत मैदान सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर शनिवारी (ता.२६) बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला. संभाजी राजे यांचा आज (27 फेब्रुवारी) उपोषणाचा दुसरा दिवस उजाडला आहे. तर अनेक नागरिक संभाजी राजे यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत हजर झाले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडमेकर तसेच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत व खासदार अनिल देसाई यांनी आंदोलन स्थळी संभाजीराजे यांना भेट दिली आहे.
यावेळीही मराठा मोर्चाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. हे पाहून खासदार संभाजी राजे यांनी उद्धव ठाकरे माझे मित्र आहे. देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहे. समाजाचे आरक्षण काढल्यापासून काहीच राहिले नाही. हा दीर्घकाळ लढा आहे, असे सांगितले.
तर घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याना माझ्यासमोर असा उद्रेक होणे बरोबर नाही. तुमचा राजा जिवंत पाहिजे असेल तर हे योग्य नाही, अशा शब्दात सुनावले.
संभाजीराजे यांना अशक्तपणा जाणवत असल्याने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. महाविकास आघाडी सरकार मार्ग काढू शकते, असे संभाजीराजे म्हणाले आहेत. माझ्या राजघराण्यातील राजा उपोषणाला बसला आहे, उद्धवजींकडे जाणार आणि लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावणार, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. Sambhaji Raje will not leave the field; Deputy Chief Minister Ajit Pawar’s reaction to the fast
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
संभाजीराजे यांच्या तपासणीसाठी जेजे रुग्णालयातून ४ डॉक्टरांचे एक पथक दाखल झालं. त्यांनी संभाजीराजेंचे रक्तदाब आणि ब्लड सॅम्पल्स घेतले. या वैद्यकीय तपासणीत संभाजीराजे यांचे ब्लड प्रेशर आणि शुगर नॉर्मल असल्याचे आढळून आल्याची माहिती जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.
यावर नुकतीच उपमुख्यमंत्र्यानी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारच्या आखत्यारीत जे मुद्दे आहेत, ते आपण सोडवू असे आश्वासन दिले असुन आंदोलनाला बसू नये असे अवाहन खासदार संभाजीराजेंना केले आहे. पार्लमेंटमध्ये केंद्र सरकार कशा पद्धतीचे बिल काढू शकते हा मुद्दा सोडविण्यासाठी केंद्राकडे आग्रहाची मागणी करावी पण अशाप्रकारे उपोषण करणे हा मार्ग नाही असेही उपमुख्यमंत्री अजित पवार असे म्हणाले आहेत
मी आज टपकलेलो नाही. २००७ पासून मी महाराष्ट्र पिंजून काढला. २०१३ मध्ये आम्ही लाखोंच्या संख्येने आझाद मैदानावर आंदोलन केले. त्यावेळी आघाडी सरकारने गठित केलेल्या राणे समितीने शिफारस केल्यानुसार ईएसबीसी आरक्षण मिळाले. पण, ते पुढे टिकले नाही.”
संभाजीराजे म्हणाले, ‘सारथी ही संस्था आरक्षणाइतकीच महत्त्वाची आहे. कोर्टाची त्यात आडकाठी नाही. कोल्हापुरात एक केंद्र सुरु केले आहे. मात्र तिथे अजून काहीही सुरू नाही. ‘सारथी’साठी ४०० कोटी जाहीर केले. त्यापैकी ४०- ५० कोटी दिले. विभागीय कार्यालय, होस्टेल कधी सुरू करणार? या बाबींची ‘ब्ल्यू प्रिंट’ दिली का? राज्य सरकारने केवळ घोषणा केल्या. तरतूद काहीच केली नाही. त्यामुळे आता माघार घेणार नाही. अर्थसंकल्पात तरतूद केलीच पाहिजे. अन्यथा, उपोषण कुठल्याही पातळीवर मागे घेणार नाही,” असे संभाजीराजे म्हणाले.