सोलापूर : सीआयडीचे उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी काल मंगळवारी (ता.31) रात्री उशिरा पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार घेतला. यावेळी शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. Additional Commissioner of Police Sudhir Hiremath takes charge; Crime control is important in policing
तत्कालीन पोलीस आयुक्त हरिष बैजल हे सेवानिवृत्त झाल्यानंतर आयपीएस अधिकारी हिरेमठ यांची पोलीस आयुक्तपदावर अतिरिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अवघ्या सात महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी पोलीस आयुक्त हरीश बैजल हे सेवानिवृत्त झाले.
सोलापुरात सेवानिवृत्त होणारे हरीश बैजल हे पहिले पोलीस आयुक्त असून त्यांचाही रथ ओढून अधिकाऱ्यांनी निरोप दिला. शासनाने सध्या सर्व बदल्या थांबविल्या आहेत. ३० जूनपर्यंत बदल्या होणार नाहीत असे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे सोलापुरात रिक्त होणाऱ्या पोलीस आयुक्तपदाबाबत प्रश्न निर्माण झाला होता. शासनाकडून नवीन पोलीस आयुक्तांची नियुक्ती होईपर्यंत सुधीर हिरेमठ यांच्याकडे अतिरिक्त पदभार राहणार असल्याचे सांगण्यात आले.
अ. आयुक्त हिरेमठ म्हणाले की, क्राइम कंट्रोल आणि लॉयन ऑर्डर पोलीस मध्ये सर्वात महत्त्वाचे असून सोलापुरात अजून चांगलं काय करता येईल या संदर्भात मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे, असे नवे पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल व आपल्या पोलीसिंगमध्ये जे उपलब्ध टेक्नॉलॉजी आहे त्याचा जास्तीत जास्त पुरेपूर उपयोग होतो का नाही तो देखील पाहणार आहे. यासंदर्भात मी डीसीपी क्राईम यांच्याशी चर्चा केली असल्याचे म्हटले.
वरिष्ठांच्या आदेशानुसार सोलापूर शहरात जोपर्यंत नवीन नियुक्ती होत नाही तोपर्यंत हा पदभार माझ्याकडे दिला आहे. माझे शालेय शिक्षण हे सोलापूर व पंढरपूर येथे झाले असून अकरावी आणि बारावी दयानंद कॉलेज येथे केली आहे. आठ वर्ष दिल्ली येथे शिक्षण घेतल्याचे म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/552535729757494/
यापूर्वी पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड येथे डीजी ऑफिस,एस.आर.पी.एफ याठिकाणी काम केले असून वाशिम,अकोला,भंडारा,गडचिरोली या जिल्ह्यात देखील काम केले आहे. त्यानंतर गेल्या वर्षी पदोन्नतीवर सीआयडी येथे डीआयजी म्हणून काम पाहत आहे. तसेच डीसीपी ट्राफिक म्हणून मी काम पाहिले असून सोलापूरच्या वाहतुकी संदर्भात देखील चांगली शिस्त लावण्याचा प्रयत्न करेल. मला माहित नाही हा चार्ज माझ्याकडे कधीपर्यंत आहे. परंतु जोपर्यंत वरिष्ठांकडून जसे आदेश येथील तोपर्यंत इथे मी काम करणार आहे, असे हिरेमठ म्हणाले.
□ सोलापूरच्या वाहतुकीसंदर्भात आढावा घेऊ
आपण डीसीपी ट्राफिक म्हणून कामकाज पाहिले आहे. सोलापूरच्या वाहतुकीसंदर्भात आढावा घेऊन शहरातील अवैध वाहतूक किंवा पार्किंगच्या समस्या असतील व वाहतुकीला शिस्त कशी लागेल या सगळ्या गोष्टीत लक्ष घालणार आहे. जनतेने ट्राफिक नियमांचे पालन करून वाहन चालवावे. ही अपेक्षा आहे. चलान करणे, चलान वसूल करणे हा नंतरचा भाग आहे. यामध्ये ट्राफिक रेगुलेशन सर्वात महत्त्वाचे आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संवाद साधला असून, चांगलं काय करता येईल यासाठी मी प्रयत्न करेन असा आशावाद व्यक्त केला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/552517596425974/