मुंबई : करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या आईला मुंडेंच्या दबावामुळेच आत्महत्या करावी लागली असे म्हणत त्यांनी मुंडेंना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवले आहे. धनंजय मुंडे यांनी खंडणीचा आरोप करुन माझ्या बहिणीला तुरुंगात डांबले असल्याचा आरोप करुणा यांनी केला आहे. Dhananjay Munde kills mother, Dhananjay uses 10 mobile number ransom charges
या आरोपामुळे महाराष्ट्रासह राजकारणात खळबळ माजली आहे. करूना शर्मा म्हणाल्या, मीच त्यांची पहिली पत्नी असून, आपल्या आईने त्यांच्यामुळेच आत्महत्या केली आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
शिवानी धनंजय मुंडे ही करुणा आणि धनंजय यांची मुलगीही पत्रकार परिषदेत येऊन मोठा खुलासा करणार होती, मात्र ती काही कारणाने तिथे उपस्थित राहू शकली नाही. धनंजय यांच्या सांगण्यावरून मी बहिणीला घराबाहेर काढले आणि मी तिच्याशी नातेही ठेवले नाही, असेही त्या म्हणाल्या आहेत. आता या नव्या वादात महाराष्ट्रापुढे काय येते हे पाहणे महत्वाचे आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/552517596425974/
करुणा शर्मा यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची राळ उठवली. धनंजय मुंडे हे मंत्री पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. धनंजय मुंडे हे खोट्या या तक्रारी करून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. धनंजय मुंडे हे स्वतः 10 मोबाईल क्रमांक वापरत आहेत. एवढे क्रमांक धनंजय मुंडे कशासाठी वापरत आहेत, असा सवाल करुणा यांनी केला. एखादी वाईट काम करणारी महिलादेखील इतके क्रमांक वापरत नाही मग धनंजय मुंडेच इतक्या मोबाइल क्रमांकाचा वापर का करतात, असा खोचक प्रश्नही त्यांनी केला.
धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या विरोधात तक्रार देण्यापूर्वी 9 एप्रिल 20 22 रोजी रेणू शर्मा यांनी एक ट्वीट केले होते. धनंजय मुंडे यांचा भांडाफोड करणार असल्याचे या ट्वीटमध्ये म्हटले होते. मात्र, त्याआधीच रेणू शर्माला खंडणीच्या खोट्या आरोपाखाली तुरुंगात डांबले असल्याचा आरोप करुणा यांनी केला.
□ नार्को टेस्ट करण्याची मागणी
धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांचे देखील संबंध होते. या संबंधामध्ये रेणू शर्मा यांच्या आईचा खून कोणी केला. या विषयी पुरावे रेणू शर्मा देणार होती. ते पुरावे नष्ट करण्यासाठी रेणू शर्माचे सर्व मोबाईल लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पोलिसांनी जप्त केले आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचा धक्कादायक आरोप करूणा शर्मा यांनी केला. त्यामुळे रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करावी आणि सत्य समोर येईल असे करुणा शर्मा यांनी म्हटले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/552535729757494/