□ मंजुरीसाठी चार – पाच महिन्यांचा कालावधी लागणार
साेलापूर – महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आंध्रप्रदेशात या मूळ केडरमध्ये बदली मागितली आहे. ही प्रक्रिया पूर्ण हाेण्यास चार महिन्यांचा कालावधी लागेल असे पी. शिवशंकर यांनीच आज बुधवारी ( ता. 1) पत्रकारांना सांगितले. Application for transfer of Municipal Commissioner to the Center Solapur P Shivshankar Sanction period
पी. शिवशंकर हे आंध्रातील २०११ च्या बॅचचे आयएएस आहेत. आपला महाराष्ट्रातील दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे आपण केडर बदलास पात्र आहाेत. यासंदर्भातील अर्ज आपण केंद्र सरकारला सादर केला आहे. आंध्रातील टाेबॅकाे बाेर्डात बदलीसाठी अर्ज केला आहे. दाेन्ही राज्यांची मंजुरी आणि केंद्र सरकारची मंजुरी यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागेल, असेही पी. शिवशंकर यांनी सांगितले.
काेराेनाच्या पहिल्या लाटेत पी. शिवशंकर यांची वखार महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून साेलापूर मनपा आयुक्तपदी नियुक्ती झाली हाेती. आयुक्तपदाचा दाेन वर्षांचा कालवधीही पूर्ण झाला आहे. अधूनमधून त्यांच्या बदलीची चर्चा असते. यादरम्यान त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/552988199712247/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ ओला आणि सुका कचरा वेगळा न करणाऱ्या शहरातील १२० नागरिकांना आर्थिक दंड
सोलापूर : महापालिकेने ओला आणि सुका कचरा विलग न करता घंटागाडीत देणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई मंगळवारी सुरू केली. पहिल्याच दिवशी १२० नागरिकांना एकूण २६ हजार २०० रुपये दंड केला. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठीच ही मोहीम हाती घेतली.
महापालिकेच्या घंटागाड्यांमध्ये कचरा देताना ओला व सुका कचरा विलग करून देण्याचे आदेश आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत. कचऱ्याचे विलगीकरण न करता कचरा दिल्यास दंडात्मक कारवाई करू, असा इशाराही आयुक्तांनी दिला होता. पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी मंगळवारी वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्या १२० नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.
पालिकेने मंगळवारी प्लास्टिक विरोधी कारवाई केली. फळभाजी विक्रेते, बाजारपेठेमधील दुकाने, हॉटेल यांची तपाणी केली. यात ९३ किलो प्लास्टिक जप्त करून ७९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. कचरा विलगीकरणासाठी लहान २७९ सोसायट्या, २३८ अपार्टमेंट, १२५ झोपडपट्टी, बाजारपेठांमध्ये प्रबोधन करण्यात आल्याचे मुख्य आरोग्य निरीक्षक नागनाथ बिराजदार यांनी सांगितले.
□ परिचारिकांचा संप मागे
#nurses #strike #maharashtra #परिचारिका #behind #सुराज्यडिजिटल #surajyadigital
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या नेतृत्वात गेल्या आठ दिवसांपासून असलेला राज्यभरातील हजारो परिचारिकांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने देण्यात आली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/553040613040339/