Sangali Terrible Accident
सांगली : जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील कासेगावजवळ कारने कंटनेरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर झाला आहे. हा अपघात आज शनिवारी (ता. 4) दुपारी झाला आहे. Sangali Terrible Accident Sangli: Terrible Accident; 5 members of Shirote family die
या अपघातात मृत पावलेले शिरोटे कुटुंबीयातील सदस्य हे जयसिंगपूर येथील आहेत. दरम्यान, रस्त्याच्याकडेला थांबलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून जोरात धडकली. यात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातात अख्ख्या कुटुंबाचा अंत झाला आहे.एकाच कुटुंबातील पाच जणांचा जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीघांचा रूग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला.
सर्व मृत जयसिंगपूर ( ता. कोल्हापूर) येथील आहेत. ही घटना आज, शनिवारी दुपारी घडली. अरिंजय आण्णासाहेब शिरोटे (वय ३५), स्मिता अभिनंदन शिरोटे (वय 38) , पृष अभिनंदन शिरोटे ( वय 14) , सुनिषा अभिनंदन शिरोटे (वय 49) , विरेंन अभिनंदन शिरोटे (वय ४) अशी मृतांची नावे सध्या समोर आली आहेत.
वेगात असणारी कार रस्त्याच्या कडेला लावलेल्या कंटेनरला धडकली. यात कारचा चक्काचूर झाला. रस्त्यावर सर्वत्र रक्ताचा अक्षरशः सडा होता. या अपघाताने गाडीचा वेग हा महामार्गावर किती असावा याविषयी सर्वांना कल्पना असणे किती गरजेचे आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/554569266220807/
मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला कंटेनर (एमएच 05 ए एम 3644) थांबलेला होता. यावेळी कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी कार (एमएच 14 डी. एन 6339) ने उभ्या असलेल्या कंटेनरच्या डाव्या बाजूस जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोघांचा जागीच तर तिघांचा उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला.
अपघातातील कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. गाडीचा वरील टप आणि दरवाजे पूर्णपणे तुटलेले होते. वरचा भाग पूर्णपणे उडाला होता. तर आतील सिटचा भाग देखील पूर्णपणे तुटलेला होता.
शिरोटे कुटुंबीय पिंपरी – चिंचवडहून जयसिंगपूरकडे निघाले असताना वाळवा तालुक्यातील कासेगावजवळील येवलेवाडी फाटा येथे हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीतील सर्वांना बाहेर काढले. यावेळी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. स्थानिकांनी जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल केले.
कॉन्स्टेबलच्या मुलीची उत्तुंग भरारी; मिस इंडिया ग्लोबल पुरस्कार पटकावला
#बीड #constable #BEED #सुराज्यडिजिटल #missindia #surajyadigital
बीड : बीडच्या भूमिका सावंतने वयाच्या 18 व्या वर्षी ‘मिस इंडिया ग्लोबल’ पुरस्कार आपल्या नावे केला आहे. यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नवी मुंबईतील वाशी येथे ही स्पर्धा पार पडली. तिची 24 स्पर्धकांमधून या पुरस्कारासाठी निवड केली गेली. तिचे वडील कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कॉन्स्टेबल आहेत. “आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करायचं आहे आणि हे मी नक्कीच करून दाखवेन, ” अशी भुमिका म्हणाली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/554416206236113/