नवी दिल्ली : जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. भाजपनेही जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्यासाठी भाजप एनडीएमधील मित्रपक्षांसोबत चर्चा करणार असल्याचं वृत्त आहे. त्याशिवाय यूपीएच्या मित्रापक्षांसोबत आणि अपक्षांसोबतही भाजप चर्चा करणार आहे. या चर्चेची जबाबदारी भाजपने जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपवली आहे. BJP’s mission ‘President’, Rajnath Singh JP Nadda took a big decision
यूपीएच्या मित्रापक्षांसोबत आणि अपक्षांसोबतही भाजप चर्चा करणार आहे. या चर्चेची जबाबदारी भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपवली आहे. केंद्रातील भाजप सरकार आणि देशातील इतर विरोधी पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. २१ जुलै रोजी राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा केली जाणार असून यासाठी मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे.
सध्या संपूर्ण देशाचे लक्ष हे भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या घोषणेकडे लागले आहे. २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर केले आहे. कोविंद यांना राष्ट्रपतीपदी विजयी करून भाजपने देशभरातील दलित समुदायाला संदेश दिला होता. सध्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ सुरू असताना भाजप आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊ शकतो, अशी चर्चा आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/560215552322845/
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल.
18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करायचे असल्यास लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे सदस्य त्यात सहभागी होतील आणि 21 जुलै रोजी मतमोजणी होईल. त्यानंतर भारताच्या नवीन राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा केली जाईल. राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
छोट्या मोठ्या पक्षांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी चुरस सुरु झाली आहे. काल रविवारी (ता. 12) भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर राष्ट्रपती पदाच्या निवडणूकबाबत मोठी जबाबदारी दिली आहे. एनडीएचे मित्रपक्ष, अपक्ष आणि युपीएच्या मित्रपक्षांसोबत चर्चा करण्याची जबाबदारी भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपवली आहे.
दरम्यान, देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सरकार शंभर टक्के बरखास्त होईल, त्यानंतर पश्चिम बंगालमधील सरकार बरखास्त होईल, असे भाकीत भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले आहे. ते सांगलीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
□ एक्झिट पोलवर बंदी घालण्याबाबत निवडणूक
आयुक्तांचा केंद्राकडे प्रस्ताव निवडणूकीबाबात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. यामध्ये मतदान ओळख पत्राशी आधार कार्ड लिंकसाठी आणि मतदान नोंदणीसाठी 4 तारखा निश्चित करणे. एक्झिट पोलवर बंदी घालणे. एका उमेदवाराला एकाच जागेवरून निवडणूक लढवता यावी. या मागणींसाठी नियम अधिसूचित करण्याबाबत हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/560340842310316/