– मिळकतदारांना महापालिकेने दिली आठ दिवसांची मुदत
सोलापूर : शहरात नव्याने बांधलेल्या मिळकती, वाढीव बांधकाम तसेच वापरात बदल केलेल्या मिळकतदारांनी आठ दिवसात महापालिकेकडे एकूण बांधकामाचे मोजमापाची नोंद करावी. या मुदतीनंतर महापालिकेकडे उपलब्ध डाटानुसार कर आकारणी निश्चित करण्यात येईल, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. Submit construction measurements, otherwise face tax increase Solapur Municipal Commissioner
दरवर्षी शहरातील नव्या मिळकतींच्या नोंदीसाठी रिव्हिजनकरिता सामूहिक नोटीस काढली जाते. परंतु यंद जुन्या – नव्या शहरातील सर्वच मिळकतदारांसाठी ही नोटीस काढण्यात आली असून बांधकामाचे मोजमाप सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे करवाढीचे भूत मिळकतदारांच्या मनगुटीवर कायम असणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांनी नाकारलेला करवाढीचा प्रस्ताव आयुक्तांनी प्रशासकीय कारकिर्दीत मंजूर केले.
शहरातील एकूण दोन लाख मिळकतींपैकी १ लाख ३० हजार मिळकतींचे विविध कारणास्तव कर वाढ केले. या करवाढीतून वर्षाकाठी ९० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून करवाढ नोटीसीचे वाटप सुरू झाले. छपाई झालेल्या १ लाख ८ हजार करवाढीच्या नोटीसापैकी ५३ हजार बिलांचे वाटप झाले. मिळकतदारांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी २१ दिवसांची मुदत दिली.
तक्रार देण्यासाठी संबंधित विभागात नागरिकांच्या रांगा लागल्या. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर झालेली करवाढ ही सर्वपक्षीयांसाठी धोक्याचे असल्याने हे बिल रद्द करण्याबाबत राजकीय दबावही निर्माण करण्यात आला. मिळकतदारांच्या वाढत्या तक्रारी आणि राजकीय दबावापोटी आयुक्तांनी ५५ हजार बिले रद्द केली होती.
मिळकतदारांना वाटप करण्यात येत असलेले करवाढीचे नोटीस थांबविले होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र महापालिकेकडे आता नागरिकांनी स्वत:हून आपल्या जागेची माहिती सादर करण्याबाबतची नोटीस काढली आहे. त्यासाठी ऑनलाईनची सुविधाही उपलब्ध करून देत आठ दिवसांची मुदत दिली आहे. नागरिकांनी आपल्या घराचे मोजमाप सादर करा, अन्यथा महापालिकेकडे उपलब्ध असलेला डाटा मान्य करा, अशा पध्दतीची नोटीस काढून प्रशासनाने करवाढीवर लक्ष केंद्रीत केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/561490515528682/
□ इलेक्ट्रीक वाहन वापरणाऱ्यास मिळकत करात मिळणार सवलत
सोलापूर – इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणाऱ्या मिळकतदारांना मालमत्ता आकारणीत सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी याबाबतची माहिती दिली.
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण असल्याचे सांगून ते म्हणाले, यापुढे महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहन वापरले तर त्यांना मिळकत करात दोन टक्के सवलत दिली जाईल. मात्र त्यांच्याकडे चार्जिंगची सोय देखील असणे बंधनकारक आहे. गृह संकुलांना देखील या कर सवलतीचा लाभ मिळणार आहे.
ज्या गृहसंकुलातील २० टक्के नागरिक इलेक्ट्रीक वाहन वापरतात त्या संपूर्ण संकुलाला एक टक्का कर सवलत दिली जाईल. चाळीस टक्के लोकांनी असे वाहन वापरले तर दोन टक्के, साठ टक्के लोकांनी वापरल्यास तीन टक्के तर सवलत, ऐंशी टक्क्यांसाठी चार टक्के आणि शंभर टक्के लोकांनी इलेक्ट्रिक वाहने वापरले तर पाच टक्के कर सवलत दिली जाईल. यासाठी संबंधित व्यक्ती अथवा संस्थांना महापालिकेकडे ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यानंतर पालिका कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी करतील.
□ सोलापुरात शहरात कोरोनाचे पाच रुग्ण, खासगी डॉक्टरांना आयुक्तांचा इशारा
सोलापूर : शहरात कोरोना संशयितांच्या तपासण्या केल्या जात असून दीड महिन्याच्या खंडानंतर पाच बाधित रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरी आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांना दररोज ३० ते ४० संशयितांच्या चाचणी करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
सोलापूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. खासगी रुग्णालयांनी आपल्या संपर्कातील संशयित रुग्णांची विभागाला कळवावी अन्यथा कारवाई केली जाईल, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.
आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, महापालिकेची आरोग्य केंद्र आणि खासगी दवाखान्यांत कोरोना चाचण्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत कोरोनाची चौथी लाट आली आहे. खासगी दवाखान्यांना पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचे आदेश दिले होते. त्यानुसारच खासगी रुग्णालयांनी आपल्याकडील संशयित रुग्णांच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/561485628862504/