● सदाभाऊ खोत यांचा आरोप, टोमॅटोसारखे लाल गाल असलेला नेता कोण ?
सोलापूर : हॉटेल बिल न भरल्याचा आरोप रयत संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यावर करण्यात आला होता. तसेच त्याचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे या मागे टोमॅटोसारखे लाल गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा हात आहे. त्याने या व्हिडिओसाठीची तयारी केली होती. शिनगारे यांना जेवढे सांगितले होते, तेवढीच वाक्ये तो बोलत होता असे सदाभाऊ खोत यांनी या व्हिडीओवर म्हंटले आहे.. A big NCP leader with a tomato-like cheek borrowed a hotel behind the Sangola variety
सांगोल्यातील प्रकारामागे टोमॅटोसारखे गाल असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता आहे. राष्ट्रवादीच्या त्या बड्या नेत्याला या प्रकरणाचं फक्त व्हिडिओ शूटींग काढून व्हायरल करायचं होतं. पण, राष्ट्रवादीच्या या नेत्याला सांगतो की, अशा पद्धतीने षडयंत्र रचून सदाभाऊंचा आवाज दाबता आणि थांबवता येणार नाही, असे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज सोलापुरात बोलताना स्पष्ट केले.
सांगोल्यात आलेल्या सदाभाऊ खोत यांना अडवून अशोक शिनगारे या हॉटेलचालकाने ‘उधारी द्या आणि मगच पुढच्या दौऱ्यावर जावा’ अशी म्हणत त्यांच्या हुज्जत घातली. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिली असून सांगोला पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सांगोला पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्या प्रकरणावर खोत यांनी आज सोलापुरात पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी वरील आरोप केला. खोत म्हणाले की, राष्ट्रवादीकडून मला धमकावण्याचा, माझ्यावर हल्ला करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. सांगोल्यातील हॉटेलचालक अशोक शिनगारे हे गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. वाळूमाफिया आणि दारुविक्रीचा त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. तो सर्व चार्ट माझ्याकडे आहे.
मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मी करणार आहे. अशा बदमाश गुन्हेगाराला आमच्या अंगावर घालून कुभाड रचून आम्हाला जीवनातून उठविण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते मी कदापि यशस्वी होणार नाही. राष्ट्रवादीच्या नेत्याचा अनेक एक वेगळा डाव होता, त्याचा मला सुगावा लागला. पण पोलिसांना का लागला नाही.
पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून ३५३ कलमानुसार गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र, रात्री नऊपर्यंत सांगोल्याचे पोलिस निरीक्षक गुन्हा दाखल करायला तयार नव्हते. मी सांगूनही पीआय गुन्हा दाखल करत नव्हते. तो चुकला आहे, माफी मागत आहे, त्यामुळे गुन्हा कशाला दाखल करायचा, असे पोलिस मला सांगत होते. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता, हेही पाहावे लागेल, असेही खोत म्हणाले.
रयत क्रांती संघटना अशा प्रकरणांचा निश्चितपणे मुकाबला करेल. येत्या २१ आणि २२ जून रोजी मुंबईत आमची राज्यव्यापी कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. आता संघर्ष अटळ आहे. हा संघर्ष राजकारणातील प्रस्थापित विरोध विस्थापित असा आहे. वाडा विरोध गावगाडा असा हा संघर्ष आहे. गावगाड्यातील माणसांना बरोबर घेऊन याचं जशास तसं उत्तर दिलं जाईल. गावगुंडांना समोर करू नका, तुमच्यात हिम्मत असेल तर समोरासमोर या. आम्ही कधीही तुमच्याशी दोन हात करायला तयार आहे, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीला दिला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/563017258709341/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
》 जुन्या जोडीदाराने खोतांची कळा खाल्ली, चारचौघांत सदाभाऊंची अब्रू काढली
सोलापूर : “मेलं तरी कुणाच्या उधारीत मरू नये’, असं पूर्वीची जुनी लोकं सांगायची. कारण उधारी कुठं निघेल आणि कुठं मान खाली घालावी लागेल, याचा काही नेम नसतो. म्हणूनच ज्यानं उधारी ठेवली आहे तो ज्याच्याकडं उधारी ठेवली आहे; त्याच्या समोरून जाणंसुध्दा टाळतो. समोरासमोर आलं की तो उधारी विचारणारच आणि चारचौघांत इज्जतीचा भाजीपाला होणारच, हे ठरलेलं असतं. असाच प्रकार गुरुवारी माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांच्या वाट्याला आला. त्यांच्याच जुन्या जोडीदारानं उधारीवरून त्यांची पार कळा खाल्ली आणि चारचौघात अब्रू काढली. आधी हॉटेलची उधारी द्या नाही तर फिरा माघारी’ असा पवित्रा घेतल्यामुळे सदाभाऊंसह लोकांची पंचायत करण्यासाठी सांगोल्यात गेलेल्या पंचायती राज समितीचीच पंचायत झाली.
पंचायती राज समितीचे सदस्य असणारे आ. सदाभाऊ खोत हे समितीमधील इतर सदस्य आ. अनिल पाटील, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार किशोर दराडे यांच्यासह गुरुवारी सांगोला दौऱ्यावर होते. पंचायत समितीच्या आवारात सदाभाऊ गाडीतून उतरताच त्यांच्याच एका जुन्या जोडीदाराने ‘भाऊ, आधी निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मग पुढच्या कार्यक्रमाला जावा, असे म्हणत ताफा अडवला आणि सदाभाऊंची बोलतीच बंद झाली.
त्यावेळी त्यांचे कार्यकर्ते बोलू लागताच, मी भाऊंशी बोलतोय, मध्ये कोणी बोलण्याची गरज नाही’ असे ठणकावत इतरांनाही गप्प केले. त्यामुळे कशीतरी वेळ मारून नेत सदाभाऊंनी स्वत:ची सुटका करून घ्यावी लागली.
सांगोला तालुक्यातील एक हॉटेलचालक व शेतकरी संघटनेच्या माजी पदाधिकारी अशोक शिनगारे
असे त्या सदाभाऊंच्या जुन्या जोडीदाराचे नाव आहे. पूर्वी तो सदाभाऊंसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करत होता. आता तो मांजरी (ता. सांगोला) येथील ग्रामपंचायत सदस्य आहे.
□ नेमके काय घडले ?
महूद ग्रामपंचायतीची पाहणी केल्यानंतर पंचायती राज समितीचा ताफा सांगोला पंचायत समितीकडे वळला. सर्वप्रथम आ. सदाभाऊंची गाडी पंचायत समितीच्या आवारात आली. गाडीमधून सदाभाऊ खोत •उतरताच अशोक शिनगारे यांनी ‘भाऊ, तुमचे तालुक्यात स्वागत आहे’, असे म्हणत सदाभाऊंना अडवले.
पुढे ‘२०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीतील माझी उधारी तेवढी अगोदर द्या. मग तुम्ही पुढील कार्यक्रमासाठी जावा. आधी आमचा निर्णय लावा. तुम्ही फोनही घेत नाही आणि घेतला तरी व्यवस्थितही बोलत नाही,’ असे म्हणत सदाभाऊंना कोंडीत पकडले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यात सदाभाऊ खोतांनाही काय बोलावे सुचेना. मात्र, सदाभाऊंनी कशीतरी समजूत काढून स्वतःची सुटका करून घेतली.
□ कसली उधारी ?
सन २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे होते. त्यावेळी सांगोला तालुक्यातील मांजरी या गावचे असलेले अशोक शिनगारे हे सदाभाऊंचे सहकारी होते. तेव्हा सदाभाऊंसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत होते. शिवाय मांजरी गावात शिनगारे यांचे हॉटेल होते. त्या हॉटेलमध्ये सदाभाऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी खाल्ल्यापिल्याची उधारी अद्याप बाकी आहे. तीच उधारी शिनगारे मागत होते.
□ मी त्यांना ओळखत नाही : सदाभाऊ
बैठकीनंतर बाहेर आलेल्या आमदार सदाभाऊ खोत यांना याबाबत विचारले असता, ‘मी त्यांना ओळखत नाही. तुम्हाला काय माहीत असेल तर मला सांगा’ असे सांगत सदाभाऊंनी ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, मला बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादीने केलेले कारस्थान आहे’ असे बोलून सदाभाऊंनी हात वर केले.
मी अनेक वेळा सांगोल्यात गेलो, परंतु कोणीही मला उधारी असल्याचे सांगितले नाही. माझा काहीही संबंध नाही. मी त्या हॉटेलमध्ये जाऊन जेवलोही नाही. हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. त्याच्या विरोधात सांगोला पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ढाबाचालकालाही पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा सर्व स्टंट आहे मी त्याला ओळखत नाही.
https://www.facebook.com/109399567404448/posts/562906182053782/