सोलापूर : पुण्यात खेळल्या गेलेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या सोळा वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत सोलापूर संघाने कोल्हापूर संघाचा साठ धावांनी पराभव केला. पाच बळी घेणारा समर्थ दोरनाल ‘प्लेयर ऑफ द मॅच’ ठरला. Invited cricket tournament: Samarth Dornal’s five wickets helped Solapur win over Kolhapur Pune
दोन दिवसांच्या या सामन्यात सोलापूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. ८३ षटकात सोलापूर संघाने सर्व गडी बाद २३१ धावा केल्या. जयराज कुमणे (५६धावा), आदर्श राठोड (५४), संकेत डोंबाळे (४६) शुभम चव्हाण (२३), सुमित अहिवळे (१७) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. कोल्हापूरकडून रुद्रा लोंढे याने ५३ धावात ३, यशराज चव्हाणने ३२ धावात २, राज पाटोळे ४२ धावात २, पृथ्वीराज निंबाळकर ३६ धावांत दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरातदाखल सोलापुर संघाने ६७ षटकात सर्वबाद १७२ धावा केल्या. अथर्व शेळके (३१) ओम मोहिते (२७) यतीराज पाटोळे (२९) अथर्व लाड (५४) रुद्रा लोंढे (२३) यांनी चांगली कामगिरी केली. गोलंदाजीत सोलापूरकडून समर्थ दोरनालने ३७ धावा देऊन पाच गडी बाद केले. आदर्श राठोडने ३४ धावात २, संकेत डोंबाळेने ४६ धावात १ तर सुमित अहिवळेने १५ धावात १ गडी बाद केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/563590125318721/
दुसऱ्यांदा सोलापूर संघाने फलंदाजी करताना तीस षटकात ४ गडी बाद १०० धावा केल्या. सुमित अहिवळेने ४१ धावा काढल्या. राजीव आहूजा २७ धावा, आदर्श राठोडने १८ धावा केल्या. कोल्हापूरकडून अथर्व शेळकेने दोन, पृथ्वीराज निंबाळकर व रुद्रा लोंढे यांनी प्रत्येकी एक बळी मिळवले. पहिल्या डावाच्या आघाडीवर सोलापूर संघाला विजयी घोषित करण्यात आले.
■ दहावीचा सोलापुरात ९७.७४% निकाल
सोलापूर – दहावी परिक्षेचा सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९७.७४ टक्के इतका लागला आहे. एकूण ६४ हजार ६५२ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली यातील ६३ हजार १९६ विद्यार्थी पास झाले आहेत. हे प्रमाण शेकडा ९७.७४ टक्के इतकं आहे.
पास झालेल्यात ३० हजार ७८७ गुणवत्तेत तर २३ हजार ०१६ प्रथम श्रेणीत, ८१६९, द्वितीय श्रेणीत तर १२२४ पास श्रेणीत यशस्वी झालेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वात चांगला निकाल मोहोळचा ९८.७२ टक्के इतका लागला आहे. तर सांगोला – ९८.२६, मंगळवेढा – ९८.६६, बार्शी – ९७.९५, सोलापूर शहर – ९७.९०, माढा – ९७.८९, अक्कलकोट ९७.५९, पंढरपूर – ९७.२० , माळशिरस – ९७.०८, करमाळा – ९६.१६ – असा तालुक्याचा निकाल आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/563555498655517/