मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेने विरोधात बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेने त्यांना गटनेते पदावरून हटवले होते. त्यानंतर अजय चौधरी यांची गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली होती. पण आता ही नियुक्ती अवैद्य आहे, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना बंडखोर 34 आमदारांच्या सह्यांचे पत्र पाठविले आहे. Ajay Chaudhary’s appointment illegal; Eknath Shinde’s letter to Assembly Deputy Speaker, challenge to Chief Minister Thackeray
‘शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत’, असे ट्विट आज एकनाथ शिंदे यांनी केले आहे. शिंदेंच्या या धक्कादायक निर्णयाने शिवसेना काय निर्णय घेते, याकडे लक्ष आहे. शिंदेंच्या या ट्विटमुळे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्यात आले आहे.
विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गुजरातला गेले. तेथून ते गुवाहाटी येथे गेले आहेत. दरम्यान, शिंदे यांच्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हेही उपस्थित आहेत. त्यात आज सायंकाळी ५ वाजता शिवसेनेतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शंभूराज देसाई यांना नोटीस पाठवून बैठकीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. पक्षाच्या बैठकीला हजर रहा नाही तर पक्ष सोडा, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/566498181694582/
“शिवसेनेने कुठलेही बंड केलेले नाही. शिवसेना आमदारांनी कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. बाळासाहेबांचे आणि हिंदुत्वाचे विचार यापासून शिवसेना आमदार कधीही फारकत घेणार नाहीत. मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झालेली आहे. बाळासाहेबांचा नारा हा बुलंद केला जाईल. बाळासाहेबांचे हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत,” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी सुरत येथून निघताना दिली होती.
“शिवसेनेचे ४० आमदार माझ्यासोबत आहेत. आम्ही सर्व जण बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत. मला कोणावर टीका करायची नाही. इथे शिवसेनेचे आमदार आहेत आणि आम्हाला बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे घेऊन जायचे आहे. माझ्यासोबत ४० आमदार इथे आले आहेत आणि आणखी १० येणार आहेत,” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहिले आहेत. महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणाऱ्या एकनाथ शिंदेंची मनधरणी सुरू असतानाच इकडे कॅबिनेटच्या बैठकीला गैरहजर राहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील ऑनलाईन पद्धतीने बैठकीसाठी उपस्थित होते. आजच्या कॅबिनेट बैठकीसाठी शिवसेनेचे फक्त तीनच मंत्री उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेत मोठी फूट पडली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/566380855039648/