मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत, आमचा उद्धव ठाकरेंना पूर्ण पाठिंबा आहे, असे स्पष्ट केले आहे. ‘ज्यावेळी शिवसेनेचे आमदार मुंबईत परत येतील, आमदारांना परत यावेच लागेल, त्यावेळी येथील परिस्थिती पूर्ण बदलेल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपच शिंदे यांच्या बंडामागे असल्याची शक्यता पवार यांनी व्यक्त केली आहे. BJP is behind Eknath Shinde’s rebellion! Ajit Pawar is not familiar with the answer given by Sharad Pawar
शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सत्तानाट्यावर महत्त्वाचं विधान केले आहे. ‘बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात यावेच लागेल, जर सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांना राज्यपालांसमोर यावेच लागेल. आमदारामागे कोणती महासत्ता आहे हे सगळ्यांना माहित आहे’, असंही पवार म्हणाले आहेत. आता पुढे राज्याच्या राजकारणात काय होत ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात सध्या मोठमोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. यात पक्ष म्हणून शिवसेना आणि दुसरीकडे सरकार म्हणून महाविकास आघाडीचे भवितव्य पणाला लागले आहे. त्यातच आज गुरुवारी (23 जून) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षातील महत्वाच्या नेत्यांची आणि आमदार-खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत पक्षाची पुढील दिशा काय असेल ते ठरवण्यात आले.
शरद पवारांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यांच्या या पत्रकार परिषदेपूर्वीच अजित पवारांची पत्रकार परिषद झाली होती. त्यात पत्रकारांनी त्यांना, या बंडखोरीमागे भाजपचा हात आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर अजित पवारांनी, मला तरी सध्या असे वाटत नसल्याचे सांगत एकप्रकारे भाजपाला क्लिन चीट दिली होती. त्यानंतर अजित पवारांच्या या उत्तराबाबत पत्रकारांनी शरद पवारांना विचारले असता, त्यांनी अजित पवारांबद्दल मोठे विधान केले.
》》 बंडामागे भाजपच…! शरद पवारांनी दिले उत्तर….
‘एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप नसल्याचे अजित पवारांनी सांगितले. अजित पवारांना इथली (महाराष्ट्रातील) स्थानिक माहिती आहे. पण गुजरात आणि आसाममधील परिस्थिती आम्हाला जास्त माहित आहे. एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यानुसार देशात सहा राष्ट्रीय पक्ष असून भाजप सोडून इतरांचा त्यांच्यामागे हात आहे का? याचा विचार करावा. गुजरात आणि आसामला ज्या लोकांनी शिंदेची व्यवस्था केली ते अजित पवारांच्या परिचयाचे नाही, ते माझ्या परिचयाचे आहेत. त्यामुळे मला त्याची माहिती आहे’, असे सांगून शरद पवारांनी या बंडामागे भाजपच असल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. याआधीही महाराष्ट्रात अशी सत्तासंघर्ष झालेली आहेत, अशी संकट आलेली आहेत, ते आपण निभावून काढली आहेत, तशीच हिम्मत कार्यकर्त्यांनी, आमदारांनी आणि नेत्यांनी ठेवावी, पुढचा काळ अवघड जरी असला तरी त्यातून बाहेर पडू असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री हे महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचे आहेत ते आपली भूमिका स्पष्ट करतील तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल. तोपर्यंत राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी राहिल असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/567319284945805/
□ एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही – अजित पवार
☆ सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना पूर्ण पाठिंबा
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. या बंडामागे भाजपचा हात असल्याचा आरोप होत आहे. मात्र या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ‘शिवसेनेतील हे आतापर्यंतचे तिसरे अंतर्गत बंड आहे, मात्र ज्या नेत्यांनी बंड केले, त्यांच्यामागे शिवसैनिक गेल्याचे मला कधीच दिसले नाही, शिवसैनिक शिवसेनेप्रती निष्ठावान राहिले’, असेही पवार म्हणाले.
अखेर सत्तानाट्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सरकार टिकवण्यासाठी आमचा उद्धव ठाकरेंना पूर्ण पाठिंबा आहे, महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरु आहेत, असे पवार यांनी स्पष्ट केले. निधी वाटपासंदर्भात होणारा आरोप त्यांनी फेटाळला आहे. निधी वाटप करताना मी कोणतीही काटछाट केली नाही, सर्वांना विकासकामांसाठी निधी दिला, दुजाभाव केला नाही, असे पवार म्हणाले.
शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांना भाजपचा पडद्यामागून पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच अजित पवार यांनी विरोधाभास विधान केलंय. शिवसेनेच्या बंडामागे भारतीय जनता पक्षाचा हात दिसत नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची आज (गुरुवार) मुंबई वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार उपस्थित होते. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना शिवसेनेच्या आमदारांच्या बंडामागे भाजपचा हात आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी शिवसेनेच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही. आताच्या घडीला भाजपचा कुठलाही नेता किंवा मोठा चेहरा गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये जावून काहीतरी करतोय ते आतातरी दिसत नाही. मी मोठ्या नेत्याची गोष्ट करतोय, असे म्हणत आपली भूमिका मांडली.
□ विकासनिधीत कधीच दुजाभाव केला नाही
अजित पवार पुढे म्हणाले, ‘आमच्या सरकारमधील काही मित्रपक्ष थोडं वेगळं विधान करत आहेत. अजित पवार असं करतात तसं करतात. मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचे आहे, सरकार अडीच वर्षांपूर्वी अस्तित्वात आले त्यावेळी 36 पालकमंत्री नेमतो. त्यामध्ये एकतृतीयांश प्रत्येक पक्षाचे नेमले गेले. त्यांना निधी देत असताना कुठेही काटछाट केली नाही. जो अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला होता तो आमदार निधी, डोंगरी विकास निधी आणि डीपीसी निधी सगळा दिलाय.
मी कधीच दुजाभाव केला नाही. उलट मी सगळ्यांना विकासकामांमध्ये मदत करण्याची माझी भूमिका असते. अनेकदा मी सकाळी साडेआठ नऊ वाजताच येऊन बसतो आणि प्रश्न सोडवण्याचं काम करतो. त्यांनी असे चॅनलला जावून बोलण्यापेक्षा आमच्या एकत्र चर्चेत सांगितले असते तर तिथल्या तिथे समज-गैरसमज दूर झाले असते. तिघांची आघाडी आहे. तिघांनी ही आघाडी कशी टिकेल याचा प्रयत्न करायला हवा होता.’
https://www.facebook.com/109399567404448/posts/566969108314156/