□ सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना पूर्ण पाठिंबा
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. या बंडामागे भाजपचा हात असल्याचा आरोप होत आहे. मात्र या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ‘शिवसेनेतील हे आतापर्यंतचे तिसरे अंतर्गत बंड आहे, मात्र ज्या नेत्यांनी बंड केले, त्यांच्यामागे शिवसैनिक गेल्याचे मला कधीच दिसले नाही, शिवसैनिक शिवसेनेप्रती निष्ठावान राहिले’, असेही पवार म्हणाले. BJP’s hand is not visible behind Eknath Shinde’s revolt – Ajit Pawar Vikasnidhi Dujabhav
अखेर सत्तानाट्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सरकार टिकवण्यासाठी आमचा उद्धव ठाकरेंना पूर्ण पाठिंबा आहे, महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरु आहेत, असे पवार यांनी स्पष्ट केले. निधी वाटपासंदर्भात होणारा आरोप त्यांनी फेटाळला आहे. निधी वाटप करताना मी कोणतीही काटछाट केली नाही, सर्वांना विकासकामांसाठी निधी दिला, दुजाभाव केला नाही, असे पवार म्हणाले.
शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांना भाजपचा पडद्यामागून पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच अजित पवार यांनी विरोधाभास विधान केलंय. शिवसेनेच्या बंडामागे भारतीय जनता पक्षाचा हात दिसत नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची आज (गुरुवार) मुंबई वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार उपस्थित होते. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना शिवसेनेच्या आमदारांच्या बंडामागे भाजपचा हात आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी शिवसेनेच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही. आताच्या घडीला भाजपचा कुठलाही नेता किंवा मोठा चेहरा गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये जावून काहीतरी करतोय ते आतातरी दिसत नाही. मी मोठ्या नेत्याची गोष्ट करतोय, असे म्हणत आपली भूमिका मांडली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/566925918318475/
□ विकासनिधीत कधीच दुजाभाव केला नाही
अजित पवार पुढे म्हणाले, ‘आमच्या सरकारमधील काही मित्रपक्ष थोडं वेगळं विधान करत आहेत. अजित पवार असं करतात तसं करतात. मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचे आहे, सरकार अडीच वर्षांपूर्वी अस्तित्वात आले त्यावेळी 36 पालकमंत्री नेमतो. त्यामध्ये एकतृतीयांश प्रत्येक पक्षाचे नेमले गेले. त्यांना निधी देत असताना कुठेही काटछाट केली नाही. जो अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला होता तो आमदार निधी, डोंगरी विकास निधी आणि डीपीसी निधी सगळा दिलाय.
मी कधीच दुजाभाव केला नाही. उलट मी सगळ्यांना विकासकामांमध्ये मदत करण्याची माझी भूमिका असते. अनेकदा मी सकाळी साडेआठ नऊ वाजताच येऊन बसतो आणि प्रश्न सोडवण्याचं काम करतो. त्यांनी असे चॅनलला जावून बोलण्यापेक्षा आमच्या एकत्र चर्चेत सांगितले असते तर तिथल्या तिथे समज-गैरसमज दूर झाले असते. तिघांची आघाडी आहे. तिघांनी ही आघाडी कशी टिकेल याचा प्रयत्न करायला हवा होता.’
□ महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडण्यास तयार, पण…
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास शिवसेना तयार आहे, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज स्पष्ट केले आहे. मात्र येत्या 24 तासात गुवाहाटी येथे असलेल्या सर्व आमदारांनी परत यावं, त्यांनी ही भूमिका उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडावी, नंतर यावर निर्णय घेतला जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/566969108314156/