मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सुरतमधून आसामच्या गुवाहाटीला हलवण्यात आले. ते आमदार गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा सरमा यांनी भाष्य करत सर्वांनाच बुचकाळ्यात टाकले होते. “महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये राहतात की नाही, हे मला माहीत नाही. तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी आपला काहीही संबंध नसल्याचेही बिस्वा यांनी सांगितले. आता हेमंत बिस्वा सरमा यांनी उद्धव ठाकरे यांना आसामला येण्याचे आमंत्रण दिले आहे. Uddhavji, you too come to Assam, enjoy the holiday Hotel Radisson Bluhimant Biswa Sarma
या विधानामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा यांनी ‘एएनआय’या वृत्तसंस्थेशी बोलत होते. आसाममधील गुवाहाटीच्या हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह तीन दिवसापासून मुक्कामाला आहेत. गुवाहाटीतील शिवसेनेच्या आमदारांबाबत हिमंत बिस्वा सरमा यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सध्या शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीतील हॉटेलमध्ये आहेत. त्यामुळे आसाम सरकारवर टीका होत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना सरमा यांनी उद्धव यांना टोला लगावला आहे. मी माझ्या राज्यात येण्यापासून कुणालाही रोखू शकत नाही, तुम्हीही आसाममध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येऊ शकता, असे सरमा म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/568211858189881/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
असम में कई अच्छे होटल हैं, वहां कोई भी आकर ठहर सकता है…इसमें कोई दिक्कत नहीं है। मुझे नहीं पता कि महाराष्ट्र के विधायक असम में रह रहे हैं या नहीं। अन्य राज्यों के विधायक भी असम में आ सकते हैं और रह सकते हैं: असम के मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, दिल्ली pic.twitter.com/Z68Ne8d4fo
— ANI_HindiNews (@AHindinews) June 23, 2022
महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये येऊन हॉटेलमध्ये राहत आहेत की नाही, याबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही, असे हिम्मत बिस्वा सरमा यांनी सांगितले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी ‘एएनआय’ला सांगितले.
“पर्यटन स्थळ म्हणून आसामची स्वतःची वेगळी ओळख आहे. राज्यात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. ज्यामध्ये कोणीही येऊन राहू शकते,” असे हिम्मत बिस्वा सरमा म्हणाले. ‘एकनाथ शिंदे कोण’असा सवाल देशभर विचारला जात आहे. देशभर महाराष्ट्रातील राजकारणाची चर्चा सुरु आहे. शिंदेबाबत देशभर नव्हे तर पाकिस्तान, सौदी या देशांमध्येही उत्सुकता आहे.
आसामचे कित्येक पोलीस त्या हॉटेलबाहेर सुरतक्षेसाठी तैणात करण्यात आले आहेत. ते पोलीस कोणाच्या सांगण्यावरू तिथे थांबले आहेत. तसेच जे शिवसैनिक गुवाहाटीला जात आहेत त्या शिवसैनिकांना पोलीस धरत असल्याचे समोर येत आहे. ह्या कारवाया कोणाच्या सांगण्यावरून होत आहेत याबाबतही चर्चा केली जात आहे. हिंमत बिस्वा यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये तथ्य असेल तर बंडखोर आमदार फिरायला गेले आहेत का हा सवाल उपस्थित केला जात आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/567959321548468/