मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आपल्या विधानावरून पलटले आहेत. आमच्या संपर्कात कोणतीही राष्ट्रीय पार्टी नाही, असे शिंदेंनी आता स्पष्ट केले आहे. याआधी एक राष्ट्रीय पार्टी आहे, एक महाशक्ती आहे, आपल्याजवळ त्यांची पूर्ण ताकद आहे, असे शिंदे यांनी म्हटले होते. त्यांनतर शिंदेंच्या बंडामागे भाजप आहे, अशी चर्चा सुरु झाली. मात्र बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांची शक्ती आपल्याकडे आहे, असे शिंदेंनी म्हटले. Eknath Shinde reversed ‘that’ statement, but the movement for the establishment of power accelerated politics meeting
एकनाथ शिंदे हे बंड पुकारलेल्या आमदारांशी संवाद साधताना ‘एक मोठी शक्ती आपल्याला साथ देत आहे’ असे म्हणाले होते. काहीही झाले तरी आम्ही जिंकू. सर्व सुख आणि दुख आपलेच आहे, असेही म्हणाले होते. मी एक मोठी शक्ती आपल्याला साथ देत आहे असे म्हटले तेव्हा मला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची शक्ती असे म्हणायचे होते, असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे म्हणाले. यामुळे शिंदे हे आपल्या पूर्वीच्या विधानावरून पलटल्याचे दिसते.
आम्ही घेतलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचे त्यांनी मला सांगितले आहे. तुमच्याकडे आमची सर्व शक्ती आहे. तुम्हाला काही हवे असल्यास आम्ही निराश करणार नाही. जेव्हा जेव्हा आम्हाला कोणत्याही मदतीची आवश्यकता असेल तेव्हा ती दिली जाईल, असेही आश्वासन पक्षाने दिल्याचे एकनाथ शिंदे आमदारांना सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसले. मात्र, त्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नाही.
हा व्हिडिओ आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी देशातील राष्ट्रीय पक्षांची नावे वाचली. त्याचबरोबर यामागे भाजपशिवाय कोणते घटक असू शकतात, हेही सांगितले. बहुमत विधानसभेत सिद्ध केले जाईल. गुवाहाटीत बसून नाही, असेही शरद पवार म्हणाले होते.
एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा केला आहे. हा गट भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसोबत चर्चा करताना एक महाशक्तिचे पाठबळ असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता, राज्यात सत्ता स्थापन करण्याची हालचाल एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे.
सत्ता स्थापन करण्यासाठी शिष्टमंडळ स्थापन करण्यात येणार आहे. आज दुपारी या बंडखोर आमदारांची बैठक होणार आहे. एकनाश शिंदे गटाच्या शिष्टमंडळात शंभूराज देसाई,दादा भुसे,भरत गोगावले, बच्चू कडू यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तर, माध्यमांमध्ये व्यवस्थित भूमिका मांडण्यासाठी प्रवक्तादेखील असणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/568211858189881/
□ ठाकरे सरकारला मोठा धक्का, नरहरी झिरवाळ यांची हकालपट्टी करण्याचा ठराव
मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाने मोठा निर्णय घेतला आहे. गुवाहटीत असलेल्या आमदारांच्या बैठकीत उपसभापती नरहरी झिरवाळ यांची हकालपट्टी करण्याचा ठराव घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 46 आमदारांच्या सह्या घेऊन प्रस्तावाच्या तयारीसाठी कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का मानला जात आहे.
बंडखोर गटाच्या ४६ आमदारांच्या सह्या घेऊन प्रस्तावाच्या तयारीसाठी कार्यवाही सुरू असल्याचीही माहिती आहे. सात पानी पाठवलेल्या पत्रामध्ये ३४ आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे काल ( गुरुवारी ) रात्रीपासून नॉट रिचेबल झाले होते. त्यांनी आपले संरक्षण सोडले असून आपण अज्ञातस्थळी जात असल्याचे म्हटले होते. शिवसेनेचे अनेक आमदार आणि मंत्री हे सुद्धा संरक्षण सोडून परराज्यात गेले आहेत.
परराज्यात जाण्यापूर्वी या आमदारांनी आपले संरक्षण मुंबईतच सोडले आणि ते अज्ञात स्थळी गेले. राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे सध्या सर्व राजकीय घडामोडीसाठी महत्वाची व्यक्ती ठरू लागले होते. नवीन गटनेते पदाची अथवा प्रतोद याची नेमणूक करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. मात्र या सर्व घडामोडीत झिरवाळ यांनीही संरक्षण सोडले आणि ते सुद्धा अज्ञात स्थळी गेले होते.
आमदार अजय चौधरी यांची राज्य विधानसभेतील शिवसेना विधीमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावाला विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ मंजुरी दिली. यासंदर्भातील पत्र उपसभापती कार्यालयाकडून शिवसेनेच्या कार्यालयीन चिटणीसांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना झटका बसला आहे.
□ सत्तास्थापनेत आता कायदेशीर अडचणी
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत आता कायदेशीर अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्याकडे आलेली यादी संशयास्पद असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष यांनी सांगितले आहे.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता नाट्यात आता नवीन पैलू समोर आला आहे. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करत त्यांच्या जागी अजय चौधरी यांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली आहे. तर प्रतोदपदी सुनील प्रभू कायम आहेत. दरम्यान शिंदे यांच्या गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचे सांगत शिवसेना पक्षाचे प्रत्येक म्हणून भरत गोगावले यांचे नाव सुचवले आहे त्यांच्यासोबत 34 आमदारांची यादी पाठवली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/567976934880040/