मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागले आहे. यात सर्वात आधी नाव येतं ते एकनाथ शिंदेंचं. शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांच्या नावाला सध्या जगभरातून सर्च केले जात आहे. एकनाथ शिंदे हे नेमके कोण आहे? याची उत्सुकता जगभरातील नागरिकांमध्ये आहे. विकिपीडियावर एकनाथ शिंदे हे सध्या मोदी, बायडेन तसेच पुतीन पेक्षा जास्त प्रसिद्ध आहे. Eknath Shinde demands Modi, Putin too, Solapur’s ‘Shahajibapu’ is also trending on social media
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उलथापालथ सुरु असतानाच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गेले तीन दिवस गुगल सर्च मध्ये टॉपवर आहेत. त्यांनी सर्च मध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यानाही मागे टाकल्याचे दिसत आहे.
एकनाथ शिंदे यांची फक्त राज्यात चर्चा नाही तर थेट पाकिस्तानात सुद्धा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावानं ४४ टक्के सर्चिंग झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नावानं फक्त १ टक्के, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं १ टक्के आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं सुद्धा एक टक्के सर्चिंग पाकिस्तानात झाल्याची माहिती समोर आली आहे.
भारतात एकनाथ शिंदे यांच्यावरील सर्च ६४ टक्क्यांवर गेला असून सुमारे १० लाख लोक शिंदे यांना सर्च करत आहेत. इतकेच नव्हे तर जगभरात एकनाथ शिंदे यांच्या विषयी कुतूहल निर्माण झाले असल्याचे दिसून आले आहे कारण सुमारे ३३ देशातील नागरिक एकनाथ शिंदे सर्च करत असून त्यात पाकिस्तान आघाडीवर आहे. नेपाळ, सौदी, थायलंड, कॅनडा, मलेशिया, बांग्लादेश, जपान मध्येही शिंदे ट्रेंड होत आहेत. पाकिस्तान आणि सौदी मध्ये हा सर्च ५० टक्क्यांवर गेला आहे.
गुवाहाटीतील हॉटेलमधील एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओत बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे आपल्या सोबत असलेल्या आमदारांना मार्गदर्शन करीत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत ते पाकिस्तानला कसा धडा शिकवला. ती शक्ती आपल्या सोबत आहे. त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही, असे बोलताना दिसत आहे.
एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानचे नाव घेतल्यानंतर पाकिस्तानात त्यांच्या नावाची सर्चिंग जास्त झाल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे कोण आहेत?, त्यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे. ते कधी पासून राजकारणार आहेत, अशी माहिती गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाकिस्तानातील लोक सर्च करीत आहेत. पाकिस्तानमधील ५० टक्क्यांहून अधिक लोकांनी एकनाथ शिंदे हा शब्द सर्च केला आहे. एकनाथ शिंदे यांचे नाव फक्त पाकिस्तानात तर नव्हे तर सौदी अरेबिया, मलेशिया, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, जपान, कॅनडा, या देशातही सर्च केले जात आहे.
एकनाथ शिंदे गटात सामील झालेले सोलापू जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ऑडिओ क्लिप वरून सध्या भलतेच आणि हसरे मॅसेज व्हायरल होताना दिसत आहेत. यामुळे अशा तणावपूर्ण वातावरणात देखील हास्याचा अनेक जण आनंद घेताना दिसत आहेत.
गुवाहाटीच्या हॉटेलमधून आमदार शहाजीबापू पाटील यांनी एका कार्यकर्त्यांशी केलेला संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसत आहे. यामध्ये आमदार शहाजीबापू पाटील हे काय झाडी, काय हॉटेल, सगळं काही ओके आहे असे सांगताना दिसत आहेत. पण यावरून सोशल मीडियावर सध्या टिंगल उडविणारे भलतेच मॅसेज व्हायरल होत असताना दिसत असून यामुळे अशा तणावपूर्ण राजकीय वातावरणातही हास्य पिकताना दिसत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/568943071450093/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/568875928123474/
शहाजीबापू या व्हिडिओमध्ये काय झाडी, काय हॉटेल, सगळं काही ओके आहे असे म्हणत असले तरी सोशल मीडियावर मात्र काय ते फटके, काय ते वळ, एकदम ओके कार्यक्रम अशा आशयाच्या पोस्ट फिरताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले असले तरी या तणावपूर्ण वातावरणात देखील या मॅसेजमुळे हास्याचे फवारे पिकताना दिसत आहेत. तर फेसबुकवरही अनेकजण आपले निसर्गरम्य काढलेले फोटो टाकून त्याला काय झाडी, काय हॉटेल, सगळं काही… असं कॅप्शन टाकत आहेत. थोडक्यात सोलापूरचे शहाजीबापू सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहेत.
□ सोशल मीडियात ट्रेण्ड होणारे ‘शहाजीबापू’ कोण ?
* शहाजीबापू पाटील हे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार.
* विद्यार्थी दशेपासून पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते.
* 1985 आणि 1990 मध्ये त्यांनी गणपतराव देशमुखांच्या विरोध
निवडणूक लढवली. त्यात पाटलांचा पराभव झाला.
* 1995 मध्ये पाटील हे 192 मतांनी विजयी.
* 1999, 2004, 2009 व 2014 च्या निवडणुकीत पराभव.
* 2019 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून. अनिकेत देशमुखांचा पराभव करत शहाजीबापू आमदार झाले.
□ भगतसिंग कोश्यारी कोरोनामुक्त; आज मिळणार डिस्चार्ज, ऐन मोक्याच्या क्षणी झाला कोरोना
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यपाल कोश्यारी यांना काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ऐन मोक्याच्या क्षणी कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने चर्चांना उत आला होता.
राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोश्यारी रूग्णालयात दाखल झाले असताना त्यांच्या कामाचा पदभार गोव्याच्या राज्यपालांकडे देण्यात येणार असल्याचे वृत्त होते.
परंतु, राज्यपाल कोश्यारींचा कार्यभार इतर कोणाकडेही दिला जाणार नाही असे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. आता कोविडमधून पूर्णपणे तंदुरूस्त होऊन राज्यपाल कोश्यारी रूग्णालयातून डिस्चार्ज घेऊन आजच राजभवनात परतले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बुधवारी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान होते.
उपचारांसाठी त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळीच राज्यपालांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राजभवनाकडून देण्यात आली होती. मात्र राज्यपालांचे वय लक्षात घेता कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यपाल कोश्यारींना काही दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे आणि विश्रांतीची गरज आहे असे सांगण्यात आले होते. त्यामुळे, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या वेळी राज्यपालांची अनुपस्थिती हा पेच फारच मोठा होता. मात्र आता राज्यपाल राजभवनमध्ये परतले आहेत.
□ ठाकरे – शिंदे वादाची ठिणगी सोलापुरात
》 युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी मनिष काळजे यांची पदावरून हकालपट्टी : एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक भोवली असून आता बालाजी चौगुले यांच्याकडे सोलापूर शहर, अक्कलकोट आणि सोलापूर दक्षिणचा पदभार दिला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/568910328120034/