सोलापूर – जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पडीक असलेल्या इमारतीमध्ये एका ७२ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेची ओळख पटली असून ही महिला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बॉण्ड रायटरचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. Woman’s body in District Collector’s office premises in Solapur, Humbarda murder committed by girls
रजिया सलीम शेख (वय 72, रा. जुना विडी घरकुल ) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. मयत महिला ही जुना विडी घरकुल परिसरात राहत होती. मागील दोन दिवसांपासून ही महिला बेपत्ता असल्याचे त्यांच्या नातेवाइकांकडून समजले. शेवटी या परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी पाहिले असता महिलेचा मृतदेह आढळून आला.
सदर बाजार पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हील हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आला आहे. ही आत्महत्या आहे की खून याबाबत तपास सुरू आहे.
या महिलेची ओळख पटली असून ही महिला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बॉण्ड रायटरचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेच्या मुलींनी ओळख पटताच हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे पथक दाखल झाले त्यानंतर घटनेचे पंचनामा करून मृतदेह ऍम्ब्युलन्समध्ये घालून सिव्हील हॉस्पिटलकडे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे. दरम्यान ही आत्महत्या आहे की खून याबाबत पोलीस तपास करत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/569873418023725/
□ सोलापुरात पासपोर्ट व्हेरीफीकेशन : लाचखोर पोलीस आणि टुर्स चालकास अटक
सोलापूर : पासपोर्ट व्हेरीफीकेशन साठी दीड हजाराची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स चालकास सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
दरवर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आकडेवारी प्रसिद्ध होते. यात वर्षभरात जिल्ह्यातील कोणत्या विभागातील अधिकारी कर्मचारी लाच घेताना आढळले ते प्रसिद्ध केले जाते. पूर्वी महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी हे आपले अव्वल स्थान टिकवून होते. परंतु अलिकडे महसूल विभागाला ओव्हरटेक करत पोलीस खात्याने हाय विक्रम मोडीत काढत लाचखोरीत आपण अव्वल असल्याचे सिद्ध केले आहे.
रेल्वे स्टेशन परिसरात खासगी प्रवासी वाहतूक करताना तक्रारदाराच्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी रेल्वे स्टेशन पोलिस चौकीतील पोलिस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर (वय ३४) याने त्यांना मासिक हप्ता म्हणून १३ हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती १२ हजार रुपये देण्याचे ठरले आणि पोलिस चौकीतच लाचेची रक्कम स्वीकारताना क्षीरसागर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होती. तीन-चार दिवसाखालीच ही कारवाई झाली होती. त्यात आज सोमवारी ही कारवाई केलीय. यातही सहायक पोलीस उपनिरीक्षकास अटक केलीय.
सहायक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गणपत शिंदे (वय ५७ वर्षे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर), सलाहुद्दीन लायक अली मुल्ला (वय ४६ वर्षे, व्यवसाय टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स चालक) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार यांनी पासपोर्ट मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला. हा अर्ज व्हेरीफिकेशन व पत्ता पडताळणी कामी जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे पडताळणी होऊन पुढील कार्यवाही होण्यासाठी प्राप्त झाला होता. तक्रारदार हे पासपोर्टचे अनुषंगाने पाठपुरावा करीत असतांना यातील लोकसेवक शिंदे यांना भेटला.
लोकसेवक असलेला सहायक पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी तक्रारदार यांना पासपोर्टचे अनुषंगाने पत्त्याबाबतची पडताळणी करुन पुढील कार्यवाही करण्याकामी १५०० रुपये लाचेची मागणी केली व सदर लाच रक्कम यातील आरोपी क्रमांक दोन खाजगी इसम मुल्ला यांचे मोबाईल क्रमांकाचे फोन पे खात्यावर पाठविण्याबाबत सांगितले व यातील आरोपी क्र.०२ मुल्ला यांनी त्यास संमती दिल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याने यातील आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असून सविस्तर लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
ही लाचलुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागाचे पोलिस निरीक्षक उमाकांत महाडीक, पोलीस अंमलदार- घुगे, घाडगे, जानराव, किणगी, सोनवणे, सण्णके, पकाले, सुरवसे यांनी केली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/569871764690557/