मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. जनतेशी संवाद साधत असताना त्यांनी ही घोषणा केली आहे. Uddhav Thackeray resigns as Chief Minister and Member of Legislative Council
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. जनतेशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली. शिंदे यांनी बंड केल्यामुळे सरकार अल्पमतात आले. त्यामुळे त्यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता. एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हे सरकार कोसळणार, हे जवळपास स्पष्ट होते. माझ्याच लोकांनी मला दगा दिला, असे भावूक विधान ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत केले.
याआधी सुप्रीम कोर्टाने आज ठाकरे सरकारला झटका दिला आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी करण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश रद्द करण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे उद्याच (30 जून) ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.
राज्यपालांनी विशेष अधिवेशन घेऊन फ्लोअर टेस्ट घेण्याचे निर्देश दिल्यानंतर शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यावर बुधवारी रात्री उशीरापर्यंत सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने अत्यंत महत्वाचा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला गुरुवारी बहुमत चाचणी घेण्यास सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. या संवादात त्यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले.
खरेतर बुधवारी सायंकाळी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे न्यायालयाच्या निकालानंतर मोठा निर्णय घेतील, असा कयास लावला जात होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीला आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले होते. आपल्याकडून कुणाचा अपमान झाला असेल किंवा कुणी दुखावलं गेले असेल तर मला माफ करा, असे भावनिक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. तसेच आपल्याला सर्वांनीच सहकार्य केले, पण माझ्याच लोकांनी धोका दिला असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.
शिवसेनेच्या वतीने बहुमत चाचणीच्या निर्णयाला देण्यात आलेल्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी रात्री उशीरापर्यंत सुनावणी सुरु होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंकडून झालेला जोरदार युक्तिवाद ऐकल्यानंतर आपला निर्णय सुनावला. महाविकास आघाडी सरकारला उद्या बहुमत चाचणी होणार, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. बहुमत चाचणी स्थगित करण्यास न्यायालयाने नकार दिला.
□ ‘रिक्षावाले, हातभट्टी वाले यांना खूप काही दिले ते आपल्यावर नाराज’
– सोनिया गांधी, शरद पवार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील – सहकाऱ्यांचे आभार, या ठरावाच्या वेळेला मी, आदित्य, देसाई आणि परब हे चारच शिवसेनेचे मंत्री.
– तातडीने मंजुरी दिली, ज्यांनी हे करायला पाहिजे होते, ते नामनिराळे, ज्यांचा विरोध भासवला, ते सोबत होते.
– रिक्षावाले, हातभट्टी वाले यांना नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, मंत्री, ज्यांना मोठं केलं, ज्यांना सत्ता दिली, ती लोकं आज आपल्यावर नाराज होता.
https://www.facebook.com/109399567404448/posts/571461887864878/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव झाले, सरकार पडण्याची तयार केली मानसिकता
□ मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट सदस्यांना म्हटले धन्यवाद !
मुंबई : राज्य मंत्रीमंडळाची आज पुन्हा एकदा बैठक बोलावण्यात आली आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे.
याशिवाय उस्मानाबादचं नामकरण धाराशीव करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला असून बैठकीत नेमकं काय घडलं याचा खुलासा केला आहे.
याशिवाय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील काही निर्णय देखील घेण्यात आले आहेत. “राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार, अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार आहे.”
आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत शहरांचे नावं बदलल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटमधील सर्व सदस्यांचे आभार मानले आहे. मला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद, मला माझ्याच लोकांनी धोका दिल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान सरकारला उद्या बहुमत चाचणीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे ही कॅबिनेटची शेवटची बैठक होती, असेही बोलले जात आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. त्यामध्ये उद्धव ठाकरे भावूक झालेले पाहायला मिळाले. माझ्या लोकांनी मला धोका दिल्याचे वक्तव्य त्यांनी केले असून, हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. त्याबरोबर मित्रपक्षांनी अडीच वर्ष भक्कम साथ दिल्याचेही त्यांनी मान्य केले.
‘या अडीच वर्षामध्ये मी कुणाचे मन दुखावले असेल किंवा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा’ असे म्हणत त्यांनी मित्रपक्षांची आणि मंत्र्यांचे क्षमा देखील मागितली. त्यांचे हे भाषण ऐकून कदाचित त्यांनी ही मानसिक तयारी करून उद्या सरकार पडणारच आहे, असे गृहीत धरले आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उद्या बहुमत चाचणी होणार असून यामध्ये सरकार पडण्याचे पूर्ण चिन्हे दिसत आहेत. कदाचित, ही राज्य मंत्रिमंडळाची उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शेवटची बैठक ठरू शकते.
माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी आज वेगवेगळ्या विचारसरणीच्या तीन पक्षांनी एकत्र येऊन काम करत असताना केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलं. दोन्ही पक्षांचं सहकार्य मिळालं, पण माझ्या पक्षाच्या काही लोकांनी दगा दिला, हे दुर्भाग्य आहे. त्यांनी साथ दिली नाही, याबद्दल दु:ख व्यक्त केलं. माझ्याकडून कुणाचा अपमान झाला असेल, किंवा कुणी दुखावलं असेल तर माफी मागतो,” असं मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/571391117871955/