मुंबई : पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पूर व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. याबाबतच्या योजनेतील जाचक अटी दूर करून शासननिर्णय लगेच काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याबाबत खासदार धैर्यशील माने तसेच आमदार प्रकाश आबिटकर यांनी लाखों शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. Eknath Shinde’s big decision for farmers, incentive grants to these farmers too
सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे राज्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक शेतकरी बांधवांचे यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या योजनेतील जाचक अटी दूर करून शासन निर्णय त्वरित काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
आमदार प्रकाश आबिटकर आणि खासदार धैर्यशील माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने लावलेले नियम जाचक आहेत. २०१८-१९ मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे. त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखों शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. याशिवाय या योजनेत गेली याशिवाय या योजनेत २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे. या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे. या निकाशत राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँका यांचे आर्थिक वर्ष वेगेवेगळे असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही असे म्हटले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/580236030320797/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी सरकार बांधील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र अनुदानासाठी घालण्यात आलेल्या अटींचा अडथळा कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही होत आहे.
शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान द्या या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उद्या (बुधवारी) रोजी कोल्हापूर येथे मोर्चा आयोजित केला आहे. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती.
पंधरा दिवसांपूर्वीच महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात याबाबत निर्णय घेऊन त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार 1 जुलैपासून अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार होते.
□ हिंगोलीत 20 गावांना भूकंपाचे धक्के
हिंगोली जिल्ह्यातील जवळपास वीस गावांना सौम्य भूकंपाचे धक्के बसले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील तब्बल 20 गावांना अचानक भूकंपाचे हादरे बसले असल्याची माहिती आहे. या घटनेनं ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/580081433669590/