मुंबई : आरे कारशेडविरोधात केलेल्या आंदोलनात लहान मुलांचा वापर केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने मुंबई पोलिसांना पत्र पाठवून आदित्य ठाकरे यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या सर्व कारवाईचा अहवाल एफआयआरच्या प्रतीसह तीन दिवसांत सादर करावा, असेही आयोगाने आदेशात म्हटले. Take action against Aditya Thackeray; Order to Mumbai Police Commissioner Carshed Commission
राज्याचे माजी पर्यावरण मंत्री, आमदार आदित्य ठाकरेंनी नियमांची पायमल्ली नियमांची केल्याची तक्रार करण्यात आली आहे. आंदोलनात प्रथमदर्शनी बाल न्याय कायद्याच्या कलम 75 चे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सह्याद्री राईट्स फोरमनं राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई पोलीस आयुक्त, राष्ट्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ईमेल पाठवत कारवाई करण्याची मागणी केली होती. सह्याद्री राईट्स फोरमने पुरावा म्हणून आदित्य ठाकरे यांचं ट्विट मेलमध्ये टाकले होते. आदित्य ठाकरे यांच्या ट्विटमध्ये लहान मुले आंदोलनात सहभागी असल्याचे दिसत आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी सह्याद्री राईट्स फोरमने केली आहे. आरेतील आंदोलनात आदित्य ठाकरेंनी लहान मुलांचा समावेश केला होता. आदित्य ठाकरे यांनी बाल न्याय हक्क संरक्षण कायदा 2015 उल्लंघन केले आहे.
त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी सह्याद्री राईट्स फोरमच्या वतीने केली आहे.याबाबत सह्याद्री राईट्स फोरमने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई पोलीस आयुक्त, राष्ट्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ईमेल पाठवला होता. या संस्थेने पुरावा म्हणून आदित्य ठाकरेंचे ट्विट मेलमध्ये टाकले होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/580103240334076/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/580053057005761/
आरेमधील मेट्रो कारशेड रद्द करावी यासाठी रविवारी (ता. 10 जुलै) काही पर्यावरण प्रेमी संस्थांकडून आंदोलन सुरु होते. त्या आंदोलनात युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. त्यांनी आंदोलनाचे फोटो ट्विट केले होते. आदित्य ठाकरेंनी ट्विट केलेल्या फोटोत काही लहान मुलांच्या गळ्यात ‘आरे वाचवा’च्या पाट्या लावून त्यांना आंदोलनात सहभागी केल्याचे दिसत आहे.
लहान मुलांना राजकीय आंदोलनात सहभागी करुन घेता येत नाही. त्यांना आंदोलनात सहभागी होण्यास भाग पाडणे त्यांच्या मानव अधिकारांचे उल्लंघन आहे, अशी तक्रार सह्याद्री राईट्स फोरमने राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर राष्ट्रीय बालहक्क आयोगाने पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली असून आदित्य ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
□ हिंगोलीत 20 गावांना भूकंपाचे धक्के
हिंगोली जिल्ह्यातील जवळपास वीस गावांना सौम्य भूकंपाचे धक्के बसले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील तब्बल 20 गावांना अचानक भूकंपाचे हादरे बसले असल्याची माहिती आहे. या घटनेनं ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी असे आवाहन • देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/580081433669590/