सोलापूर : श्रीकांत देशमुख यांच्याकडून आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत एका महिलेने आपले नाव सांगत बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल केला. यात श्रीकांत देशमुख त्या महिलेस समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहेत. BJP district president Deshmukh’s resignation approved, another Deshmukh gets temporary post video
हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असतानाच भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविला. तो राजीनामा चंद्रकांत पाटील यांनी मंजूर केला आहे.
हनीट्रॅपमध्ये अडकलेले भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी श्रीकांत देशमुख यांनी आपल्याला हॅनीट्रॅपमध्ये अडकविल्याची तक्रार मुंबईच्या ओशिवारा पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरूमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सर्व स्तरातून उमटलेल्या प्रतिक्रियांनंतर तातडीने देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार श्रीकांत देशमुख यांच्याकडे होता. बेडरुममधील व्हिडिओ आणि तक्रारींनंतर त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणे पसंत केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
सोलापूर भारतीय जनता पार्टीसाठी मोठी अडचण आणणारी घटना समोर आली आहे. जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे आता चांगलेच अडचणीत आले आहेत. देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी एका महिलेविरोधात मुंबईमध्ये हनीट्रॅपची केस दाखल केली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/580184566992610/
त्यानंतर आज मंगळवारी (ता. 12 ) त्याच महिलेने आपला बेडरूम मधील व्हिडिओ स्वत:हून व्हायरल केला आहे. त्यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे दिसतात आणि दोघांचे भांडण होते. या व्हिडिओमुळे श्रीकांत देशमुख यांची अडचण वाढण्याची चर्चा होत होती. आता भारतीय जनता पार्टी याबाबत काय निर्णय घेणार याबाबत चर्चा होत असताना हा जिल्हाध्यक्ष बदलाचा प्रकार घडला आहे. पक्षश्रेष्ठीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सध्या बेडरूममधील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
□ जुलै महिन्यात पडलेला पाऊस पेरणीस उपयुक्त, कृषी खात्याचा अहवाल
सोलापूर : संपूर्ण जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. परंतु एक जुलै ते दहा जुलै दरम्यान पडलेला पाऊस हा बऱ्यापैकी झाला असून तो पेरणीयुक्त असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.
जून मध्ये सरासरीपेक्षा एकशे दोन मिलिमीटर पाऊस पडणे आवश्यक होते. परंतु 87 मिलिमीटर कमी पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या होऊ शकले नाहीत. जुलैमध्ये सरासरी एक जुलै ते 10 जुलै दरम्यान 136 मिलिमीटर पावसाची गरज होती, असे असताना दिनांक 1 जुलै ते 10 जुलै या दरम्यान पडलेला पाऊस हा 151 मिलिमीटर इतका नोंदविला गेला आहे.
त्यामुळे दिनांक 1 जुलै ते 10 जुलै या दरम्यान झालेला पाऊस पेरण्या करण्यास उपयुक्त असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात पावसाचे वितरण सत्र हे सरसकट न झाल्याने कमी अधिक झाल्याने बऱ्याच ठिकाणच्या पेरण्या झाल्या नाहीत. पाऊस वेळेत न येणे त्यानंतर तीन-चार दिवसांनी त्यात खंड पडणे तसेच जिल्ह्यात सर्वत्र एकसमान पाऊस न होणे या सर्व कारणांमुळे पावसाची सरासरी कमी जास्त प्रमाणात झाल्याचे दिसते.
काही ठिकाणी प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्याने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पेरण्या करण्यास झालेला पाऊस उपयुक्त असून पेरण्या करण्यास हरकत नाही, असे कृषी खात्याकडून सांगण्यात आले. मात्र अजूनही पावसाचे मोठी आवश्यकता असून पेरणीसाठी जास्त पावसाचे अजूनही गरज आहे, असेही सांगण्यात आले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/580180573659676/